Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : परभणी बाजार समितीमध्ये कापूस विक्रीसाठी शेतकरी नोंदणी सुरु

Cotton Rate : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या (२०२४-२५) हंगामात भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत कापूस खरेदी लवकरच सुरु होणार आहे.

Team Agrowon

Parbhani Cotton Market : परभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या (२०२४-२५) हंगामात भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत कापूस खरेदी लवकरच सुरु होणार आहे. सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी बुधवार (ता. ६)पासून बाजार समितीच्या कार्यालयात ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुलेयांनी दिली.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी चालू वर्षीचा कापूस पीकपेरा नोंद असलेला ऑनलाइन ७-१२ उतारा, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक संलग्न बँक खाते पासबुक, आधार कार्डच्या सत्यप्रतीसह बाजार समितीच्या कार्यालयात उपस्थित राहून नोंदणी करणे आवश्यक आहे. सीसीआय मार्फत एकरी १२ क्विंटलनुसार कापूस खरेदी ग्राह्य धरण्यात येईल. एका दिवशी जास्तीत जास्त ४० क्विंटल कापूस खरेदी केला जाईल. कापसामध्ये ८ ते १२ टक्के आर्द्रता आवश्यक आहे.

१२ टक्क्यांच्या वर आर्द्रता असलेला कापूस खरेदी केला जाणार नाही. पिवळा पडलेला, पावसात किंवा पाण्यात भिजलेला कापूस खरेदी केला जाणार, नसल्याचे सीसीआयच्या प्रतिनिधींनी कळविले आहे. बाजार समितीची हिशोब पट्टी घ्यावी... परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात व कार्यक्षेत्रात नवीन सोयाबीन व कापसाची आवक सुरू आहे. एफ. ए. क्यू, प्रतीचा शेतीमाल विक्रीस येत आहे.

शेतकऱ्यांनी बाजार समित्याच्या परवानाधारक व्यापाऱ्यांना शेतीमाल विक्री करावा. शेतीमालाची विक्री केल्यानंतर संबंधित खरेदीदारांकडून बाजार समितीची अधिकृत हिशेब पट्टी घेण्यात यावी. त्यामुळे भविष्यात शासनाकडून शेतीमालासाठी अनुदान जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणे सुलभ होईल. अनधिकृतपणे शेतीमाल खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या आमिषाला बळी न पडता परवानाधारक व्यापाऱ्यांना शेतीमाल विक्री करावा. संबंधितांकडून बाजार समितीची हिशेब पट्टी घ्यावी. शेतीमालाची अधिकृत हिशेब पट्टी मिळत नसल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT