Rural Development Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : महा ई-ग्राम अॅपवर जिल्ह्यातील ३० हजार नागरिकांची नोंदणी

घरबसल्या नागरिकांना दाखले मिळण्यासाठी हे अॅप सुरू करण्यात आले आहे.

Team Agrowon

Pune News : राज्य शासनाचे (State Government) ग्रामविकास विभाग व पंचायतराज विभागामार्फत महा- ई-ग्राम (E-Gram) सिटिझन कनेक्ट नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आले आहे.

या ॲपमधून जिल्ह्यातील नागरिकांना तब्बल ३३ प्रकारच्या दाखल्यांची सुविधा उपलब्ध आहे. या अॅपला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत जिल्ह्यात १३८४ गावांतील तब्बल ३० हजार ५०४ नागरिकांनी नोंदणी केली आहे.

घरबसल्या नागरिकांना दाखले मिळण्यासाठी हे अॅप सुरू करण्यात आले आहे. याशिवाय अॅपच्या माध्यमातून घरबसल्या घराचा कर भरणा, पाणीपट्टीसुद्धा भरता येणार आहे. आतापर्यंत या अॅपचा ८८३ नागरिकांनी लाभ घेतला आहे.

त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार असून, दाखल्याकरिता ग्रामपंचायतीत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. वेळेतच त्यांना घरबसल्या दाखले मिळत आहेत. यापूर्वी केवळ जमिनीचा सातबारा उतारा ऑनलाइन पद्धतीने काढला जात होता.

मात्र यापुढे अॅपच्या माध्यमातून गावठाणमधील जागेचा उतारा ग्रामपंचायतीमध्ये मिळणारे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र यासारखे अनेक दाखले मिळणार आहेत.

सोबतच ग्रामपंचायत सदस्यांची माहिती, आपण यापूर्वी कराचा भरणा केलेल्या सर्व कराच्या रकमेची माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे.

दरम्यान, घरबसल्या जन्म प्रमाणपत्र, नागरिकांना व मृत्यू दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र नमुना नंबर ८ अ चा उतारा अशी एकूण ३३ प्रकारचे प्रमाणपत्रे मिळणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT