Tur Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Procurement: शासकीय तूर खरेदीसाठी नोंदणी बंद; ७,९७८ शेतकऱ्यांनी केली नोंदणी!

Farmer Registration: अमरावती जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया संपली असून ७,९७८ शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले.

Team Agrowon

Amravati News: हमीदराने शासकीय तूरखरेदीच्या नोंदणीसाठीची मुदत सोमवारी (ता.२४) संपली असून आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ९७८ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. यातील १ हजार ६२ शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली असून साधारणतः १५ मेपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यासाठी ३९ हजार ६५४ टन खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तांत्रिक अडचणीमुळे नोंदणीपासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत.

खुल्या बाजारात तुरीचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी शासनाने हमीदराने शासकीय खरेदी सुरू केली आहे. तुरीला ७ हजार ५५० रुपये हमीदर आहे तर खुल्या बाजारात ७,२०० ते ७,४०० रुपये दर मिळत आहे. सोमवारी स्थानिक बाजार समितीत ६६२३ पोते तूर आवक नोंदविण्यात आली.

शासकीय केंद्रांवरील नियम व निकषांमुळे शेतकरी खुल्या बाजारात तूर आणू लागले आहेत. शासनाने विदर्भ मार्केटिंग व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची २१ केंद्रे सुरू केली आहेत. शासकीय खरेदीसाठी प्रती शेतकरी १३ क्विंटल तूर खरेदी करण्यात येत आहे. यासाठी २४ फेब्रुवारीपासून नोंदणी प्रारंभ करण्यात आली होती.

त्याची मुदत २४ मार्चला संपुष्टात आली. या दरम्यान जिल्ह्यातील ७ हजार ९७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी १ हजार ६२ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे. एकूण १४ हजार ५६१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची तूर १५ मे पर्यंत खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

तूर नोंदणी व खरेदी

यंत्रणा नोंदणी प्रत्यक्ष खरेदी (क्विंटल) शेतकरी संख्या

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन ३१२३ ५६०४ ४५७

विदर्भ मार्केटिंग फेडरेशन ४८५५ ८९५६ ६०५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT