Kharif Season 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season 2024 : खरीप हंगामासाठी भरारी पथकांची नियुक्ती

Kharif Sowing : आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे.

Team Agrowon

Solapur News : आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. जिल्हास्तरावर सात सदस्यांच्या भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. कृषी विकास अधिकारी या पथकाचे प्रमुख असणार आहेत. आगामी खरिपात चांगल्या दर्जाचे बियाणे, खते व कीटकनाशके मिळावीत, यासाठी या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस असल्याचा अंदाज व्यक्त झाल्याने यंदाचा खरिप अधिक जोमात होण्याची शक्यता आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकामध्ये सोलापूर, पंढरपूर व कुर्डुवाडी येथील उपविभागीय कृषी अधिकारी, मोहीम अधिकारी, वजन व मापे विभागाचे निरीक्षक हे सदस्य असणार आहेत. समिती सदस्य सचिव म्हणून जिल्हा गुण नियंत्रण परीक्षक काम पाहणार आहेत.

तालुकास्तरावरही तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यालयातील कृषी अधिकारी, वजन व मापे विभागाचे निरीक्षक, संबंधित विभागातील मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण शाखेचे निरीक्षक हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून कामकाज पाहणार आहेत.

या पथकांनी वितरक, उत्पादक, विक्रेतेस्तरावर भेट द्यावी, बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या उगम प्रमाणपत्राची तपासणी मोहीम राबवावी. उगम प्रमाणपत्र नसल्यास तत्काळ विक्री बंदचे आदेश बाजवावेत. पथकाने वितरक, उत्पादक, विक्रेतेस्तरावर मुदतबाह्य निवेष्ठांचाही शोध घ्यावा.

मुदतबाह्य निवेष्ठांची यादी करून साठा रजिस्टरमध्ये त्याची नोंद घ्यावी. इन्व्हाईस बिल, विक्रीसाठी शिल्लक साठा याचा तामिळ घ्यावा, तफावत आढळत असेल तर तत्काळ कारवाई करावी, वितरकाने विक्रीसाठीच्या प्रत्येक बियाण्याच्या लॉटचा किमान एक नमुना ठेवला असल्याची खात्री करण्याची जबाबदारीही या पथकांवर सोपवण्यिात आली आहे.

जिल्ह्यात वाढले खरीप क्षेत्र

सोलापूर जिल्हा एकेकाळी रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. आता या जिल्ह्यात खरिपाचेही क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, माळशिरस, सांगोला, बार्शी, करमाळा या तालुक्यात खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास तीन लाख हेक्टरवर खरिपाचे क्षेत्र असल्याने जिल्ह्यातील प्रशासकिय यंत्रणा खरिपासाठी सज्ज झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Fodder Cultivation Plan: पुणे जिल्ह्यात १० हजार १०० हेक्टरवर चारा लागवड; सध्याचा साठा फक्त तीन महिन्यांसाठी

Soybean Crop Damage: पाण्याअभावी सोयाबीन पीक करपले; खेड तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात

Farmer Financial Assistance: चार नोव्हेंबरपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत मिळणार

Mission Mausam: ‘मिशन मौसम’अंतर्गत हवामान निरीक्षणासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि कृषी विद्यापीठात करार

Agriculture Service Improvement: कृषी उद्योजकांच्या सेवा कार्यपद्धतीत सुधारणा; परवाने, तपासणी अहवालांचे वितरण जलद होणार

SCROLL FOR NEXT