Watermelon Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Production : कलिंगडांचे घेतले विक्रमी उत्पादन

Team Agrowon

Mumbai News : मानगाव तालुक्यातील रेपोली गावचे प्रगतशील शेतकरी तथा जिल्हा परिषदेचे रायगडभूषण पुरस्कारप्राप्त सुनील जांभरे यांनी ५० ते ६० एकरात विविध जातींच्या कलिंगडाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले आहे.

यात लाखो रुपयांची उलाढाल करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. जांभरे कुटुंबीयांची कलिंगड लागवडीची ही ३२ वर्षांची परंपरा आहे. माणगाव बाजारपेठेत दरवर्षी सर्वांत आधी त्यांचे लाल भडक, जिभेला पाणी सुटेल असे कलिंगड विक्रीसाठी दाखल होत असतात.

शेतकरी सुनील जांभरे यांच्या वडिलांपासून कलिंगडाची शेती सुरू आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी कलिंगड लागवड व्यवसायात स्वत:ला झोकून काम केले. त्यांचा मुलगा सुजित याने पदवीधर ॲग्रीकल्चर डिप्लोमा अभ्यासक्रम केला आहे. ३२ वर्षांपूर्वी सुनील जांभरे यांचे वडील सुरुवातीला एक ते दोन एकरमध्ये कलिंगडाची लागवड करत होते.

त्या वेळी कलिंगडाचे बियाणे ७०० रुपये किलो होते. आता त्याच कलिंगड बियाणांचे भाव १४ ते १६ हजार रुपये किलो आहे. सुरुवातीला टनाचा भाव २८०० रुपये इतका होता, आता टनाचा भाव १० हजार रुपये एवढा आहे. सुनील यांच्या मुलींनीही लग्नाआधी कलिंगड व्यवसायात लक्ष घालून अथक मेहनत घेऊन मदत केली. जांभरे यांनी ५० ते ६० एकरामध्येही कलिंगडाची लागवड करून गेल्या वर्षी सुप्रित जातीचा १७ किलो वजनाचा कलिंगड त्यांच्या शेतामध्ये आला होता.

यावर्षी जांभरे व कुटुंबीयांनी माणगाव तालुक्यातील मोर्बा भागात ३५ एकरात आणि होडगाव गावच्या हद्दीत १० एकरात मिळून सुमारे ४५ एकरमध्ये कलिंगड फळाची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी सांगली येथून साधारण २० दिवसांचे गोल्डन, आयशा, ब्लॅक किंग, जिग्ना गोल्ड, सुप्रित, आगस्टा अशा विविध जातींच्या लाल भडक चवदार कलिंगडाचे दोन लाख रोपटे आणली होती.

ही रोपटी आक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला लावून कलिंगडाचा मळा जवळच्या नदीतील व क्रेशरच्या खाणीत साचलेले पाणी पंपाद्वारे ओढून शेतीला दिले. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि १० मजुरांनी दिवस-रात्र अथक परिश्रम घेत ही कलिंगडाची बाग फुलवून चांगल्या प्रकारे फळे आली आहेत.

नियोजबद्ध पद्धतीने आम्ही कलिंगड लागवड करतो. ४५ एकरात कलिंगड फळाची लागवड करताना जवळपास ३ लाख रुपये इतका खर्च आला आहे. ३० लाख रुपये उत्पन्न आम्हाला तीन महिन्यांच्या अंतरात मिळते. आजच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादन देणारे हे एक पीक असून तरुणांनी शेतीकडे वळावे.
सुनील जांभरे, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT