Maize Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Arrival : बारामतीत मक्याची २१ हजार पोत्याची उच्चांकी आवक

Maize Market : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात चालू आठवड्यात मक्याची २१ हजार पोत्यांची उच्चांकी अशी आवक होऊन मक्याला कमाल २ हजार ३५१, तर सरासरी २ हजार १७५ प्रति क्विंटल दर मिळाला.

Team Agrowon

Baramati News : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात चालू आठवड्यात मक्याची २१ हजार पोत्यांची उच्चांकी अशी आवक होऊन मक्याला कमाल २ हजार ३५१, तर सरासरी २ हजार १७५ प्रति क्विंटल दर मिळाला.

शेतीमालाच्या लिलावापूर्वी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर अचूक वजन, त्याच दिवशी पट्टी व योग्य बाजारभावामुळे शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात बारामती बाजार आवारात होत आहे, अशी माहिती समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

चालू वर्षी पाऊस समाधानकारक झाला असल्याने मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असल्याने बारामतीसह आसपासच्या तालुक्यातून मक्याची आवक होत आहे. मुख्य आवारात अडतदार म्हणून वैभव शिंदे, बाळासाहेब फराटे, शिवाजी फाळके, प्रशांत शहा, अशोक सालपे, सचिन सातव, संतोष मासाळ, दीपक मचाले यांच्या अडतीवर मोठ्या प्रमाणात मक्याची आवक झाली असून, सतीश गावडे, अशोक भळगट, दीपक मचाले, मोरे हे खरेदीदार आहेत.

बारामती बाजार आवारात मक्याबरोबर इतर भुसार मालाची आवक होत असून त्यामध्ये प्रामुख्याने बाजरी, गहू, ज्वारी, खपली, हरभरा, उडीद, मूग इत्यादी शेतीमाल विक्रीसाठी येत आहेत. आवारात बाजरीची ११६८ नग इतकी आवक होऊन बाजरीस कमाल ३ हजार ४००, तर किमान २ हजार ८०० प्रति क्विंटल दर मिळाला.

उडदाला कमाल ८ हजार, गव्हाला कमाल ३ हजार ४०१, तर किमान २ हजार ९०० आणि ज्वारीला कमाल ३ हजार ८०१ व सरासरी २ हजार ९००, हरभऱ्याचे कमाल ६ हजार ४२० प्रति क्विंटल दर निघाले. बाजार आवारात शेतीमालाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बारामती बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT