Ravikant Tupkar  Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांसोबत बैठकीच्या आश्वासनानंतर रविकांत तुपकरांचे आंदोलन स्थगित

Tupkar meet Fadanvis : मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलन मागे घेतले.

Swapnil Shinde

Mumbai News : सोयाबीन-कापूस दराच्या प्रश्नावर रविकांत तुपकर यांनी काही दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तसेच मंत्रालयाचा ताबा घेण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर तुपकरांनी आंदोलन स्थगित केले.

सोयाबीन-कापूसला चांगला दर द्यावा, राज्यात सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट एकरी १० हजार रुपये द्या, पीक विम्याचा लाभ मिळावा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते.

सरकारच्यावतीने शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा, मंत्रालयाचा ताबा घेण्यात येईल, असा इशारा तुपकरांनी दिला होता. त्यानंतर काल ते शेतकऱ्यांच्यासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज मुंबईत बैठक झाली. यावेळी तुपकर यांच्या मागण्यांबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष्य गोयल यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारच्यावतीने एक शिष्टमंडळ दिल्लीत जाणार असून त्यामध्ये तुपकरांचा समावेश करण्यात येणार आहे. येलो मोझॅकमुळे नुकसानाची भरपाई देण्याबाबतचा निर्णय हिवाळी अधिवेशनात घेण्यात येणार आहे. तसेच पीक विम्याचा १०० टक्के लाभ देण्यात येणार आहे. फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याने तुपकरांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. तसेच मागण्यांबाबत सरकारने १५ दिवसात योग्यती पाऊले उचलली नाही, तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT