Ravikant tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांनी घेतली मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट

Farmer issue : सोयाबीन, कापूस भाव वाढ व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली

Swapnil Shinde

Buladhana News : सोयाबीन आणि कापूस भाव वाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली.

सोयाबीनला प्रती क्विंटल ९ हजार रुपये, कापसाला प्रती क्विंटल किमान १२ हजार ५०० रुपये भाव द्यावा. तसेच पीक विम्याची भरपाई मिळावी या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात एल्गार मोर्चा काढला होता.

मोर्चाच्या सांगता सभेत तुपकर यांनी सरकारला इशारा देत असताना ७ दिवसांमध्ये राज्य सरकारने मागण्यांची पूर्तता न केल्यास २९ नोव्हेंबर रोजी मंत्रालयाचा ताबा घेण्याचा इशारा दिला होता.

बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आलेले सहकार मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांची रविकांत तुपकर यांनी भेट घेतली. आपल्या मागण्यांसंदर्भात रविकांत तुपकर यांनी चर्चा केली. दरम्यान रविकांत तुपकर यांनी केलेल्या मागण्या संदर्भात मंत्रीमंडळात चर्चा करणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT