Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : कर्जमाफी, पीकविमा भरपाईसाठी ‘रास्ता रोको’

Rasta Roko Protest : आंदोलना दरम्यान महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाच्या नेत्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली.

Team Agrowon

Latur News : शेतकऱ्यांना चालू व थकीत कर्जाची सरसकट माफी द्यावी तसेच मागील खरीप हंगामातील पीकविमाही तातडीने द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने लातूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर औसा टी पॉइंट येथे शनिवारी (ता. सहा) तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली. आंदोलना दरम्यान महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाच्या नेत्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्यांचे नायब तहसीलदार सुरेश पाटील यांनी स्वीकारल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

औसा तालुक्यातील सर्व महसूल मंडळाला पीकविम्याची भरपाई मंजूर करणे बंधनकारक असताना केवळ सहा मंडळातील शेतकऱ्यांची पंचवीस टक्के आगाऊ भरपाईवर बोळवण करण्यात आली. यामुळे सरसकट भरपाई मंजूर करावी.

गेल्यावर्षी कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत आला असून शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी सरसकट कर्जमाफी मंजूर करावी, निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करून झालेल्या पंतप्रधान आवास योजनेतील योजनेतील घरकुलाचे वाटप करावे, पीएम किसान योजनेतील पात्र व वंचित लाभार्थींना निधी मंजूर करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याय लक्षात आणून देत शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी व सरसकट पीकविम्याची भरपाई देण्याची मागणी केली. आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (उबाठा) माजी आमदार दिनकर माने यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अॅड. श्रीपतराव काकडे, नारायण लोखंडे, शाम भोसले, अमर खानापूरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष संजय शेटे, पप्पू कुलकर्णी, रशीद शेख, दत्तोपंत सूर्यवंशी, आबासाहेब पवार, शामराव साळुंके यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT