Sweet Orange Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Insurance : संत्रा विमा भरपाईसाठी शनिवारी ‘रास्ता रोको’

Road Stop Protest : विमा भरपाईपासून वंचित संत्रा बागायतदारांना न्याय न मिळाल्यास शनिवारी (ता.११) रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मोर्शी तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी दिला आहे.

Team Agrowon

Amravati News : विमा भरपाईपासून वंचित संत्रा बागायतदारांना न्याय न मिळाल्यास शनिवारी (ता.११) रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मोर्शी तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी दिला आहे.

राज्यात सर्वाधिक ७५ हजार हेक्‍टरच्या आसपास संत्रा लागवड क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, अचलपूर, तिवसा या तालुक्ं‍यात सर्वाधिक, तर उर्वरित ९ तालुक्यांत देखील कमी अधिक प्रमाणात संत्रा लागवड क्षेत्र आहे.

या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी २०२२-२३ या वर्षात हेक्‍टरी १२ हजार रुपयांचा भरणा करून आंबिया बहार संत्रा फळपीक विमा काढला होता. ६७ महसूल मंडळातील ३५१५ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी ३ कोटी ९८ लाख २३ हजार २०० रुपयांचा भरणा करून ३३१८.६ हेक्‍टर क्षेत्र संरक्षित केले.

त्यानंतरच्या काळात संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले. त्याबाबत नियमानुसार पूर्वसूचनाही देण्यात आली. मात्र १४ कोटी रुपयांच्या भरपाईस विमा कंपनीकडून टाळाटाळ केली जात आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर ही मदत मिळाल्यास शेतकऱ्यांसाठी हा सण खऱ्या अर्थाने गोड होईल.

त्यामुळे विमा कंपनीने जास्त न ताणता तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्‍कम जमा न झाल्यास शनिवारी (ता.११) रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही रूपेश वाळके यांनी शासन तसेच विमा कंपनीला दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT