Sugarcane Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : राजू शेट्टींचे काटा बंद आंदोलन यशस्वी, दालमिया शुगर्सकडून दर देण्याचे मान्य

Dalmiya Sugar Factory : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दत्त दालमिया साखर कारखान्याच्या गेटवर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले.

sandeep Shirguppe

Dalmiya Sugar Factory : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काल (ता.०५) कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त दालमिया साखर कारखान्याच्या गेटवर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपीपेक्षा १०० रुपये जादा दर देण्याचा निर्णय झाला असताना दालमिया साखर कारखान्याकडून कमी दर दिला जात होता यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी दालमिया साखर कारखान्याने दर दिल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका घेतली. यावर रात्री उशिरा तोडगा निघाला.

यानंतर कोल्हापुरातील दत्त दालमिया साखर कारखान्यातर्फे चालू हंगामात युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांनी ३३०० पहिली उचल जाहीर केली. तसेच उर्वरित ८४ रुपये मुख्य कार्यालयाकडून मंजुरीनंतर देण्याचे मान्य केले. यानंतर स्वाभिमानी संघटनेने कारखान्यासमोर सुरू केलेले आंदोलन मागे घेतले.

तत्पूवी प्रतिटन ३३८४ रुपये मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानीने काटा बंद आंदोलन केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात दालमियाचे अधिकारी आणि स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष सागर शंभूशेटे यांच्यात बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. निर्णय होत नसल्याने कारखान्याच्या गेटसमोर कार्यकर्ते काटा बंद करण्यासाठी पुढे गेले.

काटा गेटवर पोलिसांनी रोखल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले. गेटसमोरच माजी खासदार राजू शेट्टींसह कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. दिवसभर जिल्हाधिकारी व संघटना पदाधिकाऱ्यांत बैठका झाल्या.

दिवसभराच्या चर्चा, बैठकीनंतर अखेर रात्री साडेनऊला युनिट हेड एस. रंगाप्रसाद व राजू शेट्टी यांनी ३३०० रुपये पहिली उचल जाहीर केली. तसेच उर्वरित ८४ रुपये कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडून मंजुरीनंतर देण्याचे मान्य केले.

यावेळी सागर शंभूशेटी, सावकर मादनाईक, भीमगोड पाटील, प्रा. जालिंदर पाटील, स्वस्तिक पाटील, रामराव चेचर, विक्रम पाटील, दगडू गुरवळ, एचआर प्रमुख सुहास गुडाळे, सुरक्षा हेड रामचंद्र घराळ, जनरल मॅनेजर केन श्रीधर गोसावी, संग्रामसिंह पाटील, आदीसह संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. पोलिस उपाधीक्षक जयकुमार सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त तैनात होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT