Soybean Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : अमरावतीत सोयाबीनची ३३ टक्के शासकीय खरेदी ; मुदत आज संपणार, सव्वाचार हजार शेतकरी प्रतीक्षेत

Soybean Market : हमीदराने सोयाबीन खरेदीसाठी आज (३१ जानेवारी) ही अंतिम मुदत असून जिल्ह्यातील वीस केंद्रांवर तीन लाख नऊ हजार क्विंटल खरेदी करण्यात आली आहे.

Team Agrowon

Amravati News : अमरावती ः हमीदराने सोयाबीन खरेदीसाठी आज (३१ जानेवारी) ही अंतिम मुदत असून जिल्ह्यातील वीस केंद्रांवर तीन लाख नऊ हजार क्विंटल खरेदी करण्यात आली आहे.

शासकीय खरेदीत अमरावती जिल्ह्यास नऊ लाख १६ हजार क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले असताना मुदत आज संपत असताना निम्मेही उद्दिष्ट साध्य झाले नाही. अद्याप सव्वाचार हजार शेतकरी प्रतीक्षेत आहेत. 

सोयाबीनला यावर्षी ४८९२ रुपये प्रति क्विंटल हमीदर आहे. खुल्या बाजारात सरासरी चार हजार ते ४१०० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल शासकीय खरेदीकडे आहे.

राज्य सरकारने नाफेडच्या माध्यमातून हमीदराने शासकीय खरेदी प्रारंभ केली आहे. त्यासाठी राज्यभरात १४ लाख १३ हजार २७० मेट्रिक टन इतके लक्षांक निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यासाठी ९ लाख १६ हजार ७६ क्विंटलचा (९१.६० मे. टन) समावेश आहे.

खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंगची एकूण वीस केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. शासकीय खरेदीत सहभागी होण्यासाठी नोंदणी अनिवार्य होती. त्याची मुदत सहा जानेवारीला संपुष्टात आली. दोन्ही यंत्रणांच्या वीस केंद्रांवर १९ हजार ४९१ शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकली.

नोंदणीसाठी पोर्टलवर अडचणी आल्याने हजारो शेतकरी वंचित राहिले. मुदतवाढ दिल्याने आता ३१ जानेवारीपर्यंत खरेदी चालणार असून नोंदणीकृत चार हजार २१७ शेतकरी प्रतीक्षेत आहेत. आज वाढीव मुदत संपणार  असल्याने व खरेदीची गती बघता यातील निम्म्याच शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी होऊ शकणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT