Rajendra Dhawan and Chandrakant Jadhav Agrowon
ॲग्रो विशेष

Malegaon Sugar Factory: ‘माळेगाव’च्या साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र ढवाण पाटील यांची निवड

Sugar Industry Leadership: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र ढवाण-पाटील (बारामती) यांची शुक्रवारी (ता. २४) बिनविरोध निवड झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून श्री. ढवाण कार्यरत आहेत.

Team Agrowon

Baramati News: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र ढवाण-पाटील (बारामती) यांची शुक्रवारी (ता. २४) बिनविरोध निवड झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून श्री. ढवाण कार्यरत आहेत.

मावळते उपाध्यक्ष तानाजी नामदेव देवकाते (रा. मेखळी) यांनी आपल्या पदाचा ठरवून दिलेल्या मुदतीत राजीनामा दिला होता. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांच्या अधिपत्याखाली वरील निवडणूक पार पडली.

माळेगाव कारखान्याचे सर्वेसर्वा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार वरील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी संचालक मंडळाने सहकार्य केले. याआगोदर उपाध्यक्ष पदावर मावळते उपाध्यक्ष श्री. देवकाते यांच्यासह पावणे पाच वर्षांत चौघांना संधी मिळाल्याची नोंद आहे.

त्यामध्ये माजी उपाध्यक्ष व संचालक तानाजी तात्यासाहेब कोकरे, बन्सीलाल विलास आटोळे, सागर अशोक जाधव यांचा समावेश आहे. विशेषतः उपाध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम संपताच त्याच संचालक मंडळाच्या बैठकीत कामगार संचालक म्हणून चंद्रकांत किसन जाधव (माळेगाव) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

संभाजी होळकर, बाळासाहेब तावरे, संचालक रंजन तावरे, योगेश जगताप, मदनराव देवकाते, सुरेश खलाटे, तानाजी कोकरे, अनिल तावरे, संगीता कोकरे, अलका पोंदकुले, सागर जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT