Weather Updates  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Updates: राज्यात पावसात उघडीप शक्य

महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वच जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. मराठवाड्यात आजपासून पावसाचे प्रमाण कमी होईल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड तसेच कोल्हापूर जिल्ह्यांत आज व उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

डॉ. रामचंद्र साबळे

आज महाराष्ट्रावर उत्तरेस १००० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्याची शक्यता असल्याने पावसाचा (Rain) जोर कायम राहील. मात्र उद्या हवेचा दाब उत्तरेस १००२ व दक्षिणेस १००४ हेप्टापास्कल होण्याची शक्यता असल्याने पावसाचा जोर आणखी कमी होईल. त्यामुळे बऱ्याच भागांत पावसात उघडीप राहील. ही स्थिती बुधवार ते शनिवार (ता.२० ते २३) या कालावधीत राहण्याची शक्यता आहे. त्या वेळी महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होईल.

महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वच जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. मराठवाड्यात आजपासून पावसाचे प्रमाण कमी होईल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड तसेच कोल्हापूर जिल्ह्यांत आज व उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

बंगालचे उपसागराचे भागावर आज व उद्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राहील. बीड, परभणी, लातूर व नांदेड जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला असून, उर्वरित जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे. मात्र दुष्काळी पट्ट्यातील काही भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही.

कोकणः

आज व उद्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ६१ ते ७२ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यांत आज ३७ मिमी तर उद्या २४ ते ३४ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ किमी व रत्नागिरी जिल्ह्यांत १४ किमी तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात ११ ते १३ किमी राहील.

सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के तर दुपारची ७६ ते ८२ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्रः

नाशिक जिल्ह्यात आज ३३ मिमी तर उद्या २२ मिमी पावसाची शक्यता आहे. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत आज १० ते १२ मिमी व उद्या ५ ते १० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १५ ते १८ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६८ टक्के राहील.

मराठवाडाः

नांदेड जिल्ह्यात आज व उद्या २१ मिमी पावसाची, परभणी जिल्ह्यात आज ५ मिमी व उद्या १६ मिमी पावसाची शक्यता आहे. उर्वरित उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली व जालना जिल्ह्यांत आज ४ ते ७ मिमी व उद्या ४ ते ७ मिमी इतक्या अल्प पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद, लातूर, हिंगोली व बीड जिल्ह्यांत १७ ते १८ किमी, तर उर्वरित नांदेड, परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ताशी १३ ते १६ किमी राहील. उस्मानाबाद, लातूर, जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६० टक्के राहील. काही काळ पावसात उघडीप राहील.

पश्‍चिम विदर्भः

अकोला व अमरावती जिल्ह्यांत आज २२ ते २८ मिमी, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत १८ ते १९ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या सर्वच जिल्ह्यांत ७ ते ११ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १६ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९० टक्के तर दुपारची ६५ ते ७३ टक्के राहील.

मध्य विदर्भः

आज यवतमाळ जिल्ह्यात २१ मिमी, वर्धा जिल्ह्यात १६ मिमी व नागपूर जिल्ह्यात ३८ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या यवतमाळ जिल्ह्यात २३ मिमी, नागपूर जिल्ह्यात १२ मिमी व वर्धा जिल्ह्यात ७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १८ किमी राहील. कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ७५ टक्के राहील.

पूर्व विदर्भः

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत आज ५६ मिमी पावसाची शक्यता आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात ३५ मिमी व चंद्रपूर जिल्ह्यात २० मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत ३७ मिमी, तर चंद्रपूर जिल्ह्यात २३ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ७ ते १३ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्रः

कोल्हापूर जिल्ह्यात आज व उद्या ६० ते ६५ मिमी पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत आज ३१ ते ३८ मिमी, तर उद्या १५ ते १६ मिमी पावसाची शक्यता आहे. सोलापूर व नगर जिल्ह्यांत आज ५ ते १२ मिमी व उद्या ५ ते ७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १४ ते २० किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळच सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ८६ टक्के राहील.

कृषी सल्लाः

- हिरवळीचे खत म्हणून तागाची पेरणी करावी.

- आडसाली उसाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत पूर्ण करावी.

- शेतात साचलेले पाणी उताराकडील बांधाच्या कोपऱ्यातून काढून द्यावे.

- फळबागांची कलमे योग्य आकाराच्या खड्ड्यात लावून त्यास काठीने आधार द्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT