kolhapur Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप; धरणक्षेत्रांत दमदार

Water Stock News : कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रांत समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला.

Team Agrowon

Kolhapur Rain News : कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रांत समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. रविवारी (ता. २५) दिवसभर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पावसाची उघडझाप राहिली.

दीर्घकाळानंतर पावसाने अखेर राधानगरी तालुक्यात दमदार सलामी दिली. तालुक्यातील तिन्ही धरणांमध्ये चांगला पाऊस झाला असून शनिवारी सकाळपासून राधानगरी व काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने झोडपून काढले. यामुळे धरणांची पाणीपातळी किंचित वाढली आहे. दाजीपूरला अतिवृष्टी झाली.

शनिवारी (ता. २४) सायंकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत राधानगरी धरण क्षेत्रात १८ मिलिमीटर, काळम्मावाडीच्या धरण क्षेत्रावर २५ मिलिमीटर आणि तुळशी येथे बारा मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दाजीपूर येथे ८८ मिलिमीटर पाऊस झाला. तर राधानगरी धरण क्षेत्रावर ६० मिलिमीटर आणि काळमावाडी धरण क्षेत्रावर ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

यामुळे राधानगरी धरणाची पाणी पातळी सहा इंचाने वाढली तर काळम्मावाडी जलाशयातील पाणी पातळी दीड फुटाने वाढली आहे. शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कुंभी धरण क्षेत्रात ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पावसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा तालुक्यात मे अखेरीस सुरुवात करणाऱ्या पावसाने यावेळी जून अखेरीस म्हणजे एक महिना उशिराने सुरुवात केली आहे. गगनबावडा, बोरबेट, लखमापूर, वेसरफ, कोदे हा परिसर दाट धुक्यात हरवलेला आहे. करुळ व भूईबावडा हे घाट परिसर, बोरबेट येथील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला.

कोदे, वेसरफ, कुंभी व अणदूर इत्यादी धरण क्षेत्रात तर संततधार पाऊस पडला. भुदरगड तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी केली पण नक्षत्रच कोरडे गेल्याने शेतकरी चिंतेत होता.

पण पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आद्रा नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. चंदगड, आजरा तालुक्यांतही विविध ठिकाणी शनिवारी मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT