Nagar Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Nagar Rain Update : नगर जिल्ह्यात पन्नास महसूल मंडलांमध्ये पावसाची हजेरी

Monsoon News : मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर नगर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली. जिल्हा प्रशासनाकडे झालेल्या नोंदीनुसार ५० महसूल मंडलांमध्ये चांगला पाऊस झाला.

Team Agrowon

Nagar Weather News : मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर नगर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली. जिल्हा प्रशासनाकडे झालेल्या नोंदीनुसार ५० महसूल मंडलांमध्ये चांगला पाऊस झाला. शेवगाव, राहाता, पाथर्डी, श्रीगोंद्यात जोरदार पाऊस झाला आहे.

पावसाला सुरुवात झाल्याने शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. काही भागांमध्ये कापसाच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात रविवारी (ता. २५) दुसऱ्या दिवशीही अनेक भागात पाऊस झाला.

नगर जिल्ह्यामध्ये मॉन्सूनचा पाऊस न आल्याने खरिपाच्या पेरण्या कापूस लागवड रखडली होती. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारी (ता. २४) पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सहानंतर अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळला.

आज सकाळी आठ वाजेपर्यंत ५० महसूल मंडलांत पाऊस झाला. विरगाव शेवगाव मंडलात ६२ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

उशिराने पाऊस आल्यामुळे रखडलेले शेती कामे सुरू झाली आहेत. ज्या भागात शेतीकामे पूर्ण झाली आहे तेथे कापसाच्या लागवडीलाही सुरुवात झाली. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आज दुसऱ्या दिवशीही रविवारी बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते.

महसूल मंडलांत सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदला गेलेला पाऊस असा (मिलिमीटर) -

मालेगाव: २१, सावेडी : २९, कापूरवाडी : ४१, भिंगार : ५४, नागापूर : ३९, चिचोंडी : २३, रूईछत्तीशी : २५, पारनेर : २५, निघोज : ३१, पळशी : १९, मांडवगण : ४४, चिंबळा : ३८, राशीन : ४३, जामखेड :१८, शेवगाव : ८८, भातकुडगाव : ४८, चापडगाव : २५, एरंडगाव : ३०, पाथर्डी : ४१, माणिकदौडी : ४१ टाकळी : ३४,

कोरडगाव ६८, करंजी : ४४, मिरी : २९, नेवासा खुर्द : ६२, नेवासा बुद्रुक : ४०, सलाबतपूर : ४८, कुकाना : ४८, वडाळा : ६२, ताहाराबाद :२९, साकूर ; २२, विरगाव : ६५, समशेरपूर : ४५, रवंदे : ४९, सुरेगाव : ४९, राहता : ६३, लोणी : ६३, बाभळेश्‍वर : ६३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT