Ratnagiri Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Ratnagiri Rain : देवरूख, रत्नागिरी, राजापुरात पावसाची हजेरी

Ratnagiri Rain Update : वरूखसह रत्नागिरी, राजापूर तालुक्यांत शुक्रवारी (ता. २३) दुपारपर्यंत पडलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा दिला. रत्नागिरी शहरात सायंकाळपर्यंत पावसाची विश्रांतीच होती.

Team Agrowon

Ratnagiri Rain News : देवरूखसह रत्नागिरी, राजापूर तालुक्यांत शुक्रवारी (ता. २३) दुपारपर्यंत पडलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा दिला. रत्नागिरी शहरात सायंकाळपर्यंत पावसाची विश्रांतीच होती.

जून महिना संपत आला तरीही मोसमी पाऊस नसल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढत होती. त्याबरोबरच खरिपातील पेरण्यांचेही वेळापत्रक कोलमडले. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्यांन रोप रुजून येण्याची शंका आहे.

नद्या, नाले, धरणे कोरडी पडलेली आहेत. हवामान विभागाकडून २३ जूनला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्र सुरू झाले तरी, मॉन्सूनचे अपेक्षित असलेले दणक्यात आगमन अद्याप झालेले नाही.

पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली आहेत. लांबणीवर पडत चाललेल्या या पेरणीने शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. त्यामुळे मृगाने मारले असले तरी, आर्द्रा तरी तारणार का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना सतावत आहे.

शुक्रवारी (ता. २३) सकाळी रत्नागिरी शहरात हलकी सर पडून गेली. तर ग्रामीण भागात बराचवेळ पाऊस झाला. देवरुखमध्ये दुपारी मुसळधार पावसाची एक सर अर्ध्या तासाहून अधिक काळ पडली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. रत्नागिरी तालुक्यातील समुद्र किनारी भागामध्ये वेगवान वारे वाहत होते.

या वाऱ्यांबरोबर अभाळ भरून येत होते, पण कालांतराने पुन्हा सूर्यदर्शन होत होते. ज्या परिसरात पाऊस पडला तेथे पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला. राजापुरात सकाळपासून पाऊस पडत होता. म्हणावा तितकासा जोर नसला तरी, पडणाऱ्या सरींनी जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT