Rain Forecast Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update In Beed : बीडमध्ये पाऊस, गारपिटीचा २७६२ हेक्टरवरील पिकांना फटका

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमागे संकटाचे फेरे सुरुच आहेत. पंधरवड्यात दुसऱ्यांदा गारपिट व अवकाळी पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Crop Damage In Beed : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमागे संकटाचे फेरे सुरुच आहेत. पंधरवड्यात दुसऱ्यांदा गारपिट (Hailstorm) व अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला आहे.

शनिवारी (ता. ८) अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि वीज पडल्याने एक शेतकऱ्यासह लहान - मोठ्या २० जनावरांचा मृत्यू झाला. तर, दोन शेतकरी जखमी झाले.

अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा पाच तालुक्यांतील शंभर गावांना बसला असून यामुळे २७६२ हेक्टरांवरील रब्बी पिकांसह फळपिके व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.

दुपारनंतर जिल्ह्यात अचानक वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारपीट झाली. गारपीट, वादळी वारे व अवकाळी पावसाचा तडाखा बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा, केज या तालुक्यांत प्रामुख्याने बसला आहे.

यामध्ये शंभर गावांतील २७६२ हेक्टरांवरील डाळिंब, लिंबू, द्राक्ष, कांदे, मिरची, टरबूज, गहू, अंबा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. यात ४३२७ बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे.

शनिवारी विजांच्या मोठा कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. वीज पडून आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर, बीड तालुक्यातील दोन शेतकरी वीज पडून जखमी झाले आहेत.

बीड व केज तालुक्यांत प्रत्येकी पाच - पाच मोठे जनावरे वीज पडून ठार झाले. तर, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यात देखील प्रत्येकी दोन - दोन जनावरे ठार झाले आहेत. तर, शिरूर कासार तालुक्यात एक, पाटोदा तालुक्यात चार व केज तालुक्यात एक अशा सहा लहान जनावरांचा मृत्यू झाला आहे.

वादळी वाऱ्यामुळे शेतातील सौर कृषिपंपांचे नुकसानही झाले आहे. सौर कृषिपंपांचे सेट उखडून पडले आहेत. गारपीट, वादळी वारे व अवकाळी पावसाने गेवराई, आष्टी, पाटोदा, केज तालुक्यातील ४३२७ शेतकऱ्यांचे २७६२ हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने द्राक्ष, अंबा, लिंबू व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT