Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांत पाऊस

Parbhani, Hingoli Rain News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत अद्याप मोसमी पाऊस पुरेसा नसल्याचे दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून बहुतांश भागात रिझमिझम पाऊस पडत आहे.

Team Agrowon

Parbhani Today Rain : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत अद्याप मोसमी पाऊस पुरेसा नसल्याचे दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून बहुतांश भागात रिझमिझम पाऊस पडत आहे. मोठ्या पावसाअभावी जमिनीत ओलावा नसल्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

दरम्यान, या दोन जिल्ह्यांतील जिल्ह्यातील ८२ मंडलांत मंगळवारी (ता. २७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील ५२ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ३ मिमी, तर जूनमध्ये आजवर एकूण सरासरी ३०.३ मिमी (२३.२ टक्के) पाऊस झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव, तसेच तालुक्यातील ३० मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६.६ मिलिमीटर, तर जूनमध्ये आजवर एकूण सरासरी ३६.९ मिलिमीटर (२४.२ टक्के) पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

परभणी जिल्हा - सिंगणापूर ६.३, जिंतूर ७.३, सावंगी म्हाळसा ६.३, बामणी ६.३, आडगाव ८.५, वाघी धानोरा ६, गंगाखेड ५.८, चाटोरी ११.८, रावराजूर ६.५, ताडकळस ५.५, लिमला ६.५.

हिंगोली जिल्हा - हिंगोली ८, नरसी नामदेव ७.८, आखाडा बाळापूर १०.३, डोंगरकडा १२, वारंगा १०.३, आंबा ९.३, गिरगाव ५.३, हट्टा ११.८, टेंभुर्णी ६.८, कुरुंदा ७.५, औंढा नागनाथ १२.३, येळेगाव ६.५, साळणा ८.५, सेनगाव ७, साखरा १०.८, पानकनेरगाव ८, हत्ता ७.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT