Maharashtra Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : दक्षिण भारतात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यात थंडीची स्थिती काय आहे?

Weather Update : राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

Team Agrowon

Pune News : दक्षिण भारतात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. तर उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातही काही भागात थंडी जाणवते. राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

आग्नये अरबी समुद्र आणि शेजारच्या मालदीव भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थइती समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. तर पश्चिमी विक्षोप समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहेत.

उत्तर भारतात थंडी चांगली वाढली आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर राजस्थानच्या बऱ्याच भागात तसेच उत्तर प्रदेशातील अनेक भागात किमान तापमान ६ अंश सेल्सिअस ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

दक्षिणेतील काही भागात पाऊस पडत आहे. केरळमध्ये काही भागात ढगांच्या गडगडाट आणि विजांसह काही भागात पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.
राज्यातही अनेक भागात थंडी वाढली आहे. किमान तापमानत काहिशी घट झाली.

राज्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. पण पावसाची नोंद झाली नाही. राज्यातील बहुतांशी भागात हवामान कोरडे होते. तसेच दुपारी काही ठिकाणी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तसेच कडक थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT