Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : नगरमध्ये पाऊस सुरूच

Nagar Rain News : श्रीगोंद्यातील मांडवगण महसुल मंडलांत २१ मिलिमीटर, श्रीगोंदा महसुल मंडलात १९, तर नगर तालुक्यातील रुईछत्तीशी मंडलात १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरुच आहे. शनिवारी (ता. ११) जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. श्रीगोंद्यातील मांडवगण महसुल मंडलांत २१ मिलिमीटर, श्रीगोंदा महसुल मंडलात १९, तर नगर तालुक्यातील रुईछत्तीशी मंडलात १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी (ता. १२) दिवसभर ढगाळ वातावरण होते. सततच्या पावसाने फळे, भाजीपाला, कांदा पिकाला फटका बसत असून वादळाने घरांचे व अन्य नुकसान होत आहे.

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. एक तर प्रचंड उकाडा, त्यात ढगाळ वातावरणामुळे उष्मा अधिक आहे. अचानक वातावरणात बदल होऊन वादळी पाऊस होत आहे. शनिवारी जिल्ह्यातील शेवगाव, नगर, पारनेर, राहुरी, कर्जत, श्रीगोंदा भागातील अनेक गावांत पाऊस झाला. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

प्रशासनाकडे झालेल्या नोंदीनुसार, चिंचोडी पाटील मंडलात १५ मिलिमीटर, भाळवणीला ३, पळशीला १२, श्रीगोंदा येथ १९, मांडवगणला २१, बेलवंडीला ९, मिरजगावला ७, देवदैठण, कुंभळीत प्रत्येकी तीन, शेवगावातील एरंडगावला ७, माणिक दौंडीला १५, टाकळीला १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

गेल्या आठवडाभरापासून ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून वीज तारांवर, रोहित्रांवर पडल्याने अनेक भागातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. काढणी केलेल्या कांद्यासह भाजीपाला, फळे, उन्हाळी पिकांत प्रामुख्याने बाजरी पिकांचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले. प्रशासन पंचनामे करत आहे.

जिल्ह्यात आठवडाभरात कर्जत, कोपरगाव, पारनेर, अहमदनगर शहर, अकोले या तालुक्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. वादळात वीज पडून अकोले तालुक्यातील एक व्यक्ती मयत झाली आहे.

संगमनेर तालुक्यात २, कर्जत तालुक्यात २, जामखेड तालुक्यात १ आणि पारनेर तालुक्यात ८ शेळ्या अशा लहान-मोठ्या १३ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. यासह कर्जतमध्ये २१, कोपरगावमध्ये ७ आणि पारनेर तालुक्यात ३ अशा ३१ घरांची पडझड झालेली आहे. जिल्ह्यात कर्जतच्या भांबोरा, कोपरगाव, संगमनेर तालुक्यातील डोळासणे आणि घारगाव, अकोले तालुक्यातील साकीरवाडी, राजूर, शेंडी, कोतूळ आणि ब्राह्मणवाडा या महसूल मंडळात चांगल्या पावसाची नोंद झाली.

पावसाने एका व्यक्तीसह १३ जनावरांचा मृत्यू

नगर ः जिल्ह्यात आठवडाभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे १३ लहान-मोठी जनावरे आणि ३१ घरांची पडझड झाली आहे. उन्हाळी हंगामातील शेती पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT