Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : रब्बी पेरण्या सुसाट

Rabi Sowing : राज्यात रब्बीचा पेरा अतिशय वेगाने पुढे जात असून, शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १४० टक्के पेरा केला आहे.

मनोज कापडे

Pune News : राज्यात रब्बीचा पेरा अतिशय वेगाने पुढे जात असून, शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १४० टक्के पेरा केला आहे. यंदा एकूण पेरा सहा ते सात लाख हेक्टरने वाढण्याची शक्यता आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यातील मोठ्या व मध्यम जलाशयांमध्ये यंदा पुरेसा साठा आहे. परतीचा मॉन्सूनदेखील लांबल्यामुळे काही प्रमाणात खरिपाला तडाखा बसला असला, तरी रब्बीसाठी पोषक स्थिती बनली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे मृदा आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते आहे. त्यामुळेच यंदा रब्बीचा पेरा वाढणार आहे. राज्यात सरासरी ५४ लाख हेक्टरवर रब्बीची पिके घेतली जातात. चालू रब्बी हंगामात चार पेरा वाढून ६० लाख हेक्टरपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज कृषी विभागाचा आहे.

हरभरा, गहू, ज्वारी आणि मका अशी रब्बीमधील प्रमुख पिके असून, या पिकांचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १०० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या वर्षीच्या रब्बीत शेतकऱ्यांनी नोव्हेंबरच्या पंधरवड्याअखेर १५ लाख हेक्टरवर पेरा केला होता. यंदा मात्र याच पंधरवड्यात पेरा २१ लाख हेक्टरपर्यंत आला आहे.

तसेच विशेष म्हणजे गव्हाचा पेरा गेल्या हंगामाच्या तुलनेत २६७ टक्क्यांपर्यंत झालेला आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी याच कालावधीत ५२ हजार हेक्टरवर गहू पेरला होता. हाच पेरा सध्या दीड लाख हेक्टरपर्यंत गेला आहे. राज्याचे प्रमुख रब्बी पीक असलेला हरभरा गेल्या हंगामात याच कालावधीत साडेपाच लाख हेक्टरवर होता. सध्या तो वाढून साडेआठ लाख हेक्टरपर्यंत गेला आहे.

राज्यात मॉन्सूनचा पाऊस चांगला झाल्यामुळे पाणीसाठे व मातीमधील ओलावा रब्बीला पोषक ठरला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांकडून रब्बीचा पेरा ५-६ लाख हेक्टरने वाढवून ६० लाख हेक्टरच्या आसपास नेला जाण्याचा अंदाज आहे.
- रफिक नाईकवाडी, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT