Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : खानदेशात रब्बी पेरण्यांना गती

Rabi Sowing : खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्यांना गती आली आहे. पेरण्या सुमारे ५० टक्के पूर्ण झाल्या आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्यांना गती आली आहे. पेरण्या सुमारे ५० टक्के पूर्ण झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक पेरणी हरभऱ्याची झाली आहे. गेल्या वेळेस रब्बी हंगाम जेमतेम होता. यंदा पाऊसमान चांगले झाल्याने रब्बी जोमात असणार आहे.

खरिपात हानी झाली. यामुळे रब्बीवरच शेतकऱ्यांची मदार आहे. खानदेशात सुमारे चार लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होईल. त्यात हरभऱ्याची सुमारे दोन ते सव्वादोन लाख हेक्टरवर पेरणी होईल. खरिपात कापूस, उडीद, मूग, ज्वारी आदी पिकांची हानी झाली आहे.

रब्बीची पेरणी सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक होवू शकते. जळगावात हरभऱ्याची सर्वाधिक सुमारे एक लाख हेक्टरवर पेरणी होणार असून, जिल्ह्यात सुमारे १०० ते ११० टक्के क्षेत्रात पेरणी होईल, असे चित्र आहे.

जळगाव जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र पावणोदन लाख हेक्टर आहे. तर पेरणी एक लाख ७० हजार हेक्टरपर्यंत झाल्याचा अंदाज आहे. पेरणी गेल्या वेळेस ८० टक्क्यांवर झाली होती. खानदेशात सुमारे पावणेचार लाख हेक्टरवर रब्बी पेरणीची अपेक्षा असून, पेरणी सुमारे ४५ टक्के झाली आहे. धुळ्यातील रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार हेक्टर तर नंदुरबारात सुमारे ४२ हजार हेक्टर एवढे क्षेत्र आहे. या दोन्ही जिल्ह्यातही पेरणी वाढणार आहे.

कार यंदा पाऊस बऱ्यापैकी आहे. जळगाव जिल्ह्यात गिरणा धरणातून रब्बीसाठी पाणी मिळणार असल्याने गिरणा पट्ट्यात रब्बी हंगाम चांगला राहणार आहे. खानदेशात रब्बीची पेरणी एकूण दोन लाख ३० हजार हेक्टरवर नोव्हेंबरच्या मध्यातच होईल, असा अंदाज आहे. त्यात सर्वाधिक हरभरा पीक राहणार आहे. यापाठोपाठ दादर ज्वारी व संकरित ज्वारी, मका, गहू यांची पेरणी होणार आहे.

हरभरा, गहू, ज्वारीची पेरणी ऑक्टोबरमध्येच करण्याचे नियोजन अनेक शेतकरी करीत आहे. संकरित ज्वारी, बाजरी, मका, कांदा यांची लागवडही अपेक्षेनुसार होणार आहे. मक्याची लागवडही रब्बी हंगामात जोमात होईल.

ही लागवड व पेरणी मागील १५ ते १८ दिवसांपासून गतीने सुरू आहे. कारण निरभ्र वातावरण आहे. खानदेशात मक्याची सुमारे एक लाख हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. ज्वारीची पेरणी सुमारे ४५ हजार हेक्टरवर होईल, अशी अपेक्षा आहे. गव्हाची पेरणीदेखील १८ हजार हेक्टरपर्यंत होईल.

कांदा लागवडही सुरू

कांदा लागवडही काही भागात सुरू आहे. यंदा कांदा लागवड स्थिर राहील, कारण पाऊसमान चांगले असल्याने धुळ्यातील लागवड कायम राहील. जळगाव जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर, धुळ्यात तीन हजार हेक्टरवर तर नंदुरबारात सुमारे एक हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित आहे.

बाजरीची पेरणी जानेवारीच्या मध्यापर्यंत सुरू राहील. बाजरीची पेरणीदेखील सुमारे सात ते आठ हजार हेक्टरपर्यंत होईल, असे सांगण्यात आले. धुळ्यात अनेर, पांझरा प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातही वाघूर, हतनूर धरणातून पाणी सोडले जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT