Kolhapur Rabi Season agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rabi Season : कोल्हापुरात रब्बी हंगाम पडणार लांबणीवर; उत्पन्न घटण्याची शक्यता

Rabi Season Kolhapur : ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे शेतकरी साधारणपणे सोयाबीन, भात, भुईमुगाची काढणी झाल्यानंतर‍ हरभरा, गहू, शाळू पिकाची पेरणी करतात.

sandeep Shirguppe

Kolhapur Rain Crop Damage : गतवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच रब्बीच्या पिकांनी शेतशिवार फुलल्याचे चित्र कोल्हापूर जिल्ह्यात होते. परंतु यंदा पाऊस असल्याने जिल्ह्यात अद्याप खरीप पिकांची काढणी सुरू आहे. परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामही लांबणार असून, याचा परिणाम उत्पादनावरही होण्याची शक्यता आहे.

मंडल कृषी अधिकारी सुनिल डवरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुदरगडसह अनेक तालुक्यात पावसामुळे ऊस लागण उशिरा होण्याची शक्यता आहे. तर अनेक ठिकाणी रब्बी पिकांची लागवड लांबणीवर जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बऱ्याचशा क्षेत्रात पाणी साचून राहिल्याने जमिनी घातीवर येण्यासाठी वेळ लागणार आहे. तसेच येणाऱ्या थंडीचा विचार करता पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे डवरी यांनी सांगितलं.

खरिपाचा हंगाम संपल्यानंतर शेतकरी रब्बीची पेरणी करतात. हरभरा, गहू, शाळू, मक्का उत्पादक शेतकरी शेती मशागतीची कामे करून नियोजन करतात. परंतु, यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सुरुवातीपासूनच जमिनीत ओल कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मशागत करता आली नसल्याचे दिसून येते.

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे शेतकरी साधारणपणे सोयाबीन, भात, भुईमुगाची काढणी झाल्यानंतर‍ हरभरा, गहू, शाळू पिकाची पेरणी करतात. यावर्षी सुरुवातीपासून सतत पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय भात, सोयाबीन, भुईमूग पिकांचे नुकसान होऊन काढणीही लांबली.

मागील आठवडाभर पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर जे काही पीक शिल्लक आहे, अशा पिकांची चिखलातून काढणी शेतकरी करताना दिसत आहे. दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ज्वारी, मका पेरणी झालेली असते ऊस तेवढाच शेतात शिल्लक राहतो.

भात, भुईमूग, सोयाबीनची काढणीची सध्या धांदल सुरू आहे. साहजिकच त्यामुळे खरिपाची काढणी लांबली. परिणामी, रब्बीचे पीक घेण्यासाठी शेतात मशागत होऊ शकली नाही. उत्पादनाचा विचार केल्यास रब्बी हंगामातील हरभरा उत्पादनात सध्याच्या अंदाजानुसार ५ ते १० टक्के घट येण्याची शक्यता आहे. अद्याप थंड पडायला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे यावर्षी थंडीचा मोसमही लांबण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Water Budgeting: समृद्ध गावशिवारासाठी पाण्याचा ताळेबंद

FPO Success Story: विविध उपक्रमांमधून ‘सातबारा’ कंपनीची आश्‍वासक वाटचाल

Post Harvest Management: काढणीपश्चात तंत्रज्ञानाची सद्यःस्थिती अन् आव्हाने

Spice Business Success: बीटेक पदवीधराचा ‘अष्टगुण मसाले’ ब्रॅंड

Mushrooms Health Benefits: पोषणमूल्ययुक्त आरोग्यदायी अळिंबी

SCROLL FOR NEXT