Rabi Season agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : निपाणी तालुक्यात रब्बी हंगामातील पेरणीची लगबग

Nipani Rabi Season : महाराष्ट्राच्या सीमेला असलेल्या निपाणी तालुक्यात तालुक्यातील शेतकरी सध्या रब्बी हंगामातील पेरणी कामे पूर्ण करण्याच्या लगबगीमध्ये आहेत.

sandeep Shirguppe

Nipani Maharashtra Border : महाराष्ट्राच्या सीमेला असलेल्या निपाणी तालुक्यात तालुक्यातील शेतकरी सध्या रब्बी हंगामातील पेरणी कामे पूर्ण करण्याच्या लगबगीमध्ये आहेत. पावसामुळे वारंवार भात कापणी कामांमध्ये अडथळा येत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. रब्बी हंगामातील पिके घेण्याच्या दृष्टीने पावसाने उसंत घेण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

अवकाळी पाऊस तालुक्यासह परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून कायम कोसळत आहे. त्यामुळे भात कापणीचा हंगाम लांबणीवर पडला आहे. भात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची दाट शक्यता आहे.

अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने भात पीक कुजल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. काही भागात भात कापणी करण्यात आली आहे. त्या पिकामध्येही पाणी साचल्याने सुक्या चाऱ्यासह भात पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या उसंतीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी विलंब होत आहे. तालुक्याच्या बहुतांश भागात रब्बी हंगामातील ज्वारी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भात कापणी व बटाटा काढणीनंतर ज्वारीची पेरणी केली जाते. मात्र, वारंवार पावसाचा अडथळा येत असल्याने रब्बी हंगामातील पेरणी करण्यास विलंब होत आहे. अनेक शेतकरी रब्बी हंगामातील पेरणीची कामे पूर्ण करण्याच्या लगबगीमध्ये असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT