Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : साताऱ्यात एक लाख ३० हजार हेक्टरवर रब्बी ज्वारी लागवड

Rabi Season : पाऊस रब्बी हंगामाच्या दृष्टिने फायदेशीर ठरला आहे. पोषक वातावरणामुळे मशागत तसेच पेरणीची कामे वेळेत सुरू झाली होती. यामुळे या हंगामात सरासरी क्षेत्राइतकी म्हणजे शंभर टक्के पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील शंभर टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रब्बी ज्वारीची एक लाख ३० हजार १०१ हेक्टर लागवड झाली असून परतीचा तसेच बिगर मोसमी पाऊस झाल्याने ज्वारीची उगवण व वाढ झाली आहे. यामुळे रब्बी ज्वारीच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत.

जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले होते. मात्र हा पाऊस रब्बी हंगामाच्या दृष्टिने फायदेशीर ठरला आहे. पोषक वातावरणामुळे मशागत तसेच पेरणीची कामे वेळेत सुरू झाली होती. यामुळे या हंगामात सरासरी क्षेत्राइतकी म्हणजे शंभर टक्के पेरणी झाली आहे.

रब्बीच्या अंतिम अहवालानुसार १०१.५८ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रब्बी ज्वारीचा वाटा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रब्बी ज्वारीचे एक लाख ३५ हजार ५३१ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी एक लाख ३० हजार१०१ हेक्टर लागवड झाली आहे. जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्वच तालुक्यात ज्वारीची पेरणी झाली आहे.

यामध्ये सर्वाधिक माण तालुक्यात ३६ हजार ५४१ हेक्टर पेरणी झाली आहे. ज्वारीच्या लागवडीनंतर अनेक ठिकाणी एक ते दोन दमदार पाऊस झाले होते. यामुळे ज्वारीची उगणवण, वाढ दमदार झाली आहे. सध्या थंडीचे प्रमाणही चांगले असल्याने ज्वारीस फायदेशीर ठरत आहे.

ज्वारीचा चारा व उत्पादन यासाठी उपयुक्त होत असल्याने घटलेले ज्वारीचे क्षेत्र पुन्हा वाढू लागले आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या ज्वारीची कणसे भरू लागली आहेत. सध्या ज्वारीच्या अवस्था चांगल्या असल्याने उत्पादनाच्या अपेक्षा शेतकऱ्यांच्या वाढल्या आहेत. चाऱ्यास मागणी चांगली रहाण्यासाठी शक्यता असल्याने कडब्यास चांगला दर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तालुकानिहाय रब्बी ज्वारी पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये)

सातारा १०,२१२

जावळी ९,१७३

कऱ्हाड ५,१९३

कोरेगाव १३,८८०

खटाव २०,९८७

माण ३६,५४१

फलटण १३,९०४

खंडाळा ८१००

वाई ८,११४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT