Rabi Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop : रब्बीतील पिकांची जोमदार वाढ होईना

Post Monsoon Rain : मॉन्सूनोत्तर पूर्वी पेरलेल्या गहू या पिकाची वाढ होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पिकाचा रंगही पिवळा पडला आहे.

Team Agrowon

Washim News : मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका गहू पिकाला बसला आहे. गव्हाची वाढ खुंटली असून रंगही पिवळा पडला आहे. युरियाची मात्रा देऊनही उपयोग होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

नोव्हेंबर महिन्यात या भागात २६ ते २८ दरम्यान मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकटच कोसळले होते. ऑक्टोबरच्या शेवटच्या व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या गहू व हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

या भागात ७५ टक्के शेतकऱ्यांना हरभऱ्याची दुबार पेरणी करावी लागली. मॉन्सूनोत्तर पूर्वी पेरलेल्या गहू या पिकाची वाढ होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पिकाचा रंगही पिवळा पडला आहे. युरियाची मात्रा देऊनही फायदा होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

त्याचप्रमाणे पावसामुळे गहू पिकामध्ये तणाचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तणनाशकाची फवारणी केल्यास अजूनही जास्त नुकसान होण्याची शक्यता होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. प्रयत्नांची पराकाष्टा करून हे पीक वाचवले तरी उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गहू व हरभऱ्याची पेरणी केली होती. पिकात पाणी साचून राहल्यामुळे हरभरा पूर्णपणे जळून गेला. हरभऱ्याची दुबार पेरणी केली आहे. पावसाचा गव्हाला फायदा होईल असे वाटले होते. परंतु गव्हाचे पीकही पिवळे पडले. युरियाची मात्रा देऊनही फारसा फरक जाणवत नाही.
प्रवीण पाटील बोंडे, शेतकरी, रा. व्याड, ता. रिसोड, जि. वाशीम.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT