Crop Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Harvesting : रब्बीतील पिकांच्या काढणीचा जोर वाढला

पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर असून आत्तापर्यंत २ लाख ९७ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

Team Agrowon

Latur News : विभागातील रब्बी हंगामातील (Rabi Season) सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर असून १६ लाख ७९ हजार ३६१ हेक्टर क्षेत्रावर १२३ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. रब्बीतील पिकांच्या काढणीचा (Rabi Crop Harvesting) जोर वाढला आहे.

विकण्या क्षेत्र व स्थिती(स्रोत कृषी विभाग)

रब्बी ज्वारी ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर असून आत्तापर्यंत २ लाख ९७ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ८० टक्के आहे. पीक सद्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. रब्बी ज्वारी पिकाची सध्या काढणी सुरु असून १५ ते २० टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.

गहू ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर असून आत्तापर्यंत १ लाख ५४ हजार २१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ९९ टक्के आहे.

पीक सद्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. पिकाची सध्या काढणी सुरु असून ४० ते ५० टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.

हरभरा ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर असून आत्तापर्यंत ११ लाख ५९ हजार ८३९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.त्याची टक्केवारी १४८ टक्के आहे.

पीक सद्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. पिकाची सध्या काढणी सुरु असून ६० ते ७० टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.

मका : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १७९७१ हेक्टर असून आत्तापर्यंत १७७६४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ९९ टक्के आहे. पीक सद्या कणसे भरण्याच्या अवस्थेत आहे.

करडई-पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९५३१ हेक्टर असून आत्तापर्यंत २३९४८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी १२३ टक्के आहे. पीक सद्या पक्वतेच्या अवस्थेत असून काही ठिकाणी पिकाची काढणी सुरु आहे तर ५० ते ६० टक्के काढणी पूर्ण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development Funds: यांत्रिकीकरण, ‘आत्मा’साठी केंद्राकडून भरघोस निधी

Tur Price Drop: वाशीमला तुरीच्या दरात ५०० रुपयांची घसरण

PDCC Bank Profit: पुरंदरमध्ये जिल्हा बँकेला २३ कोटींचा नफा

Sangli Grape Export: सांगलीच्या दहा हजार टन द्राक्षांची परदेशात निर्यात

Reduce Quality Control Inspectors: गुणनियंत्रण निरीक्षकांची संख्या कमी करण्यास नकार

SCROLL FOR NEXT