Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Loan : रब्बी पीककर्ज प्रस्ताव वाढू लागले

Rabi Season : खानदेशात रब्बी हंगामात केळी व इतर पिकांसाठी पीककर्ज प्रस्ताव बँकांकडे दाखल होत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बी हंगामात केळी व इतर पिकांसाठी पीककर्ज प्रस्ताव बँकांकडे दाखल होत आहेत. किमान ६०० कोटी रुपये निधीची गरज त्यासाठी असणार आहे. खरिपात खानदेशात सुमारे २५०० कोटी रुपये निधीची आवश्यकता असते. या तुलनेत रब्बीमध्ये पीककर्जाची कमी मागणी असते.

याबाबत मध्यंतरी प्रशासनाने नियोजन केले होते. त्यात मागणी व निधी यावर चर्चा झाली होती. मागील एप्रिल, मे महिन्यांत कोविडमुळे अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज मिळू शकले नाही. जूनपासून कर्ज प्रस्ताव मार्गी लावण्याचे काम वेगात सुरू झाले. या प्रस्तावांसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव अनेकांना शक्य झाली नाही.

यामुळे अनेक वंचित शेतकरी आता रब्बीमध्ये पीककर्ज मागणी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे तीन हजार शेतकऱ्यांचे पीककर्ज प्रस्ताव राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकांकडे दाखल झाले आहेत. हे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे. कारण शेतकऱ्यांना निधीची गरज आहे.

केळी व इतर पिकांसाठी पुढे खते, मजुरी आदी खर्च लागणार आहे. खरिपात पिकांची हानी झाल्याने निधीची अधिकची गरज शेतकऱ्यांना आहे. रब्बी हंगाम सुरू झाला आहे. त्यासाठी देखील निधीची गरज आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अधिकचे कर्ज प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यात सीबिलची कटकटही शेतकऱ्यांसमोर उभी केली जात आहे. यामुळे अधिकची अडचण होत आहे. त्यात जामिनदार, कर्जदार यांचे कर्ज परतफेडीचे रेकॉर्ड तपासले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT