Paddy MSP Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy MSP : हमीभावाने २१ कोटी रुपयांच्या धानाची खरेदी

चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडून यंदाच्या हंगामात ३६ केंद्रांवर हमीभावाने धान खरेदीचे नियोजन होते. मात्र प्रत्यक्षात ३२ केंद्रांवर धानाची आवक झाली.

Team Agrowon

Chandrapur News : आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून चिमूर प्रकल्पातील विविध केंद्रावर एक लाख ५ हजार ९९९ धानाची खरेदी (Purchase paddy) करण्यात आली आहे. खरेदी करण्यात आलेल्या या धानाची किंमत (Rice Rate) २१ कोटी ६१ लाख ९५३ रुपये असल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडून यंदाच्या हंगामात ३६ केंद्रांवर हमीभावाने धान खरेदीचे नियोजन होते. मात्र प्रत्यक्षात ३२ केंद्रांवर धानाची आवक झाली.

यात नवखळा, मोहाडी, मोकासा, सावरगाव, जीवनापूर, बाळापूर, चिंधीचक, गोविंदपूर आणि कोजबी या केंद्रांचा समावेश आहे.

सिंदेवाही तालुक्यातील तांबेगडी, मेंढा, लाडबोरी, मुरमाडी, कळमगाव, गडबोरी, शिवनी, नाचणभट्टी, वरोरा तालुक्यांत चारगाव, भटाळा, वडधा, भद्रावती तालुक्यात चंदनखेडा, चोरा आणि आष्टा या धान खरेदी केंद्राचा समावेश आहे.

या धान खरेदी केंद्रांवर या वर्षी हमीभाव २०४० रुपये आहे. गेल्या दोन वर्षे अगोदरपर्यंत शेतकऱ्यांना सातशे रुपयापर्यंत बोनस देण्यात येत होता. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडे धान विक्रीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढला होता.

मात्र गेल्या वर्षीपासून बोनसबाबत संदिग्धता आहे. या वर्षी शासनाने हेक्‍टरी बोनसची घोषणा केली आहे. त्यातून क्विंटलमागे फार तोकडी रक्कम मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

त्यातच बोनस संदर्भात स्पष्टता न करता आदेशही काढण्यात आले नाही. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये आणखीनच गोंधळ वाढला आहे.

हमीभावाने धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला ऑनलाइन नोंदणी करावी लागते. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडे ७३७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती आहे.

यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून आतापर्यंत एक लाख ५ हजार ९९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या धानाची किंमत २१ कोटी ६१ लाख ९५३ रुपये इतकी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT