Rice Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : आदिवासी विकास महामंडळाकडून ४१ खरेदी केंद्रांना मंजूरी; ५० हजार क्विंटल धान खरेदी

Rice procurement center : गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. ४१ केंद्रांकडून ५० हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.

Swapnil Shinde

Gondia News : गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मागील काही दिवसांपासून भाताची कापणी झाल्यानंतर व्यापाऱ्यांकडून कमी भावात धानाची खरेदी केली जाते. म्हणून तातडीने धान खरेदी करण्याची मागणी होत होती. आदिवासी विकास महामंडळाने जिल्ह्यात ४१ खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. आतापर्यंत ५० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दूधनाग यांनी दिली.

गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग विभाग यांच्याद्वारे शासकीय खरेदी केंद्र सुरू न केल्चा गैरफायदा खाजगी व्यापारी घेत असतात. त्यामुळे शेतकऱ्या कमी भावात खाजगी व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये धानाला चांगला भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा शासकीय दराने धान विकण्याकडे कल असतो. त्यामुळे शासनाने तातडीने शासकिय खरेदी करण्याची मागणी होत होती.

गोंदिया जिल्ह्यातील ८ तालुक्यांपैकी ४ तालुक्यांमध्ये मार्केट फेडरेशन तर ४ तालुक्यांमध्ये आदिवासी विकास महामंडळ धान खरेदी करते. हंगाम २०२३-२४ मध्ये आदिवासी विकास महामंडळाचे एकंदरीत ४४ केंद्रा पैकी ४१ खरेदी केंद्र मंजूर झाले आहे. त्यांच्या माध्यमातून ५० हजार क्विंटल धान खरेदी केली आहे. सध्या अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असल्याने उघड्यावर असलेली काही खरेदी केंद्र बंद आहेत. तर ज्या संस्थांचे गोदाम आहेत. अशा संस्थांकडून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जवळपास ३० केंद्रमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT