Village Development Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Roads Development: पुण्यात पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणांना बसणार लगाम!

Village Roads: शेतरस्त्यांचे पिढ्यान्‌पिढ्या सुरू असलेले वाद संपविण्यसाठी आणि प्रत्येक शेतशिवाराला रस्ता मिळण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणंद रस्ते मोहीम हाती घेण्यात आली आहे.

गणेश कोरे

Pune News: शेतरस्त्यांचे पिढ्यान्‌पिढ्या सुरू असलेले वाद संपविण्यसाठी आणि प्रत्येक शेतशिवाराला रस्ता मिळण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणंद रस्ते मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी रस्त्याअभावी अडचणी येतात, तर काही ठिकाणी पाणंद रस्ते, शेत रस्त्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. आता हे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहेत.

पुढील तीन महिन्यांत जिल्ह्यातील शेतरस्ते खुले करण्यात येणार असून, त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पाणंद, शेतरस्ते ग्रामस्थांच्या सहकार्याने तसेच सामंजस्याने खुले करण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते.

तसेच कुटुंबाचे विभाजन होत असल्याने शेतीचे देखील विभाजन होत आहे. त्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी-कमी होत आहे. त्यामुळे शेतातून सुरू असलेली वहिवाट काही शेतकरी बंद करतात. त्यामुळे सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वहिवाट रस्ते, ग्रामीण रस्ते, खुले करण्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर असे रस्ते खुले करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

...अशी आहे कार्यपद्धती

सुरुवातीला पाणंद रस्ते निश्चित करण्यासाठी तलाठी गाव नकाशे भूमिअभिलेख विभागाकडून उपलब्ध करून घेणार

तलाठी प्रत्यक्ष भेट देऊन बंद असलेल्या रस्त्यांची यादी तयार करणार

बंद असलेले रस्ते ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून जातात, त्यांची यादी तयार करणार, असे रस्ते खुले करण्यासाठी सरपंच, शेतकरी यांची बैठक घेऊन समन्वयाने ते खुले करणार

काही ठिकाणी पोलिसांच्या साह्याने रस्ते खुले करणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT