Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC Scam: पुणे बाजार समितीच्या गैरव्यवहारांची नव्याने चौकशी

Vikas Rasal order: गैरव्यवहारांच्या चौकशीचा निंबाळकर समितीचा अहवाल अद्याप गुलदस्तात असताना, आता नव्याने चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती पणन संचालक विकास रसाळ यांनी स्थापन केली आहे.

गणेश कोरे

Pune News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर दोन वर्षांपूर्वी संचालक मंडळ नियुक्त झाल्यानंतर बाजार समिती विविध गैरव्यहारांनी चर्चेत आली होती. या गैरव्यवहारांच्या चौकशीचा निंबाळकर समितीचा अहवाल अद्याप गुलदस्तात असताना, आता नव्याने चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती पणन संचालक विकास रसाळ यांनी स्थापन केली आहे.

या समितीच्या अध्यक्षपद जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्याकडे देण्यात आले आहे. या समितीने विविध ५१ गैरव्यवहारांच्या चौकशीचे आदेश दिल्यामुळे संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहेत.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती २००२ मध्ये गैरव्यवहारांमुळे बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल २१ वर्षे २०२३ पर्यंत बाजार समितीवर प्रशासक आणि प्रशासकीय मंडळाची राजवट होती. या नंतर पुन्हा झालेल्या निवडणुकीनंतर बाजार समितीवर गैरव्यवहारांचे आरोप असलेले आणि बरखास्त करण्यात आलेल्या संचालक मंडळातील काही संचालकांची पुन्हा निवड झाली.

यानंतर पुन्हा एकदा बाजार समितीमध्ये शेतकरी हित दुर्लक्षित राहून, गैरव्यवहारांची शृंखला सुरू झाली. या बाबत विविध प्रसार माध्यमांमधून झालेल्या वृत्तांची आणि विविध सामाजिक संस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार नव्याने समिती स्थापन केली आहे. दरम्यान, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी देखील गैरव्यवहार प्रकरणी बाजार समिती बरखास्त करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

चौकशीत विविध मुद्द्यांचा समावेश

विविध गैरव्यवहारांमध्ये सेस चोरी, अनधिकृत बांधकामे, कंत्राटे, सुरक्षारक्षक एजन्सी नियुक्ती, पार्किंग निविदा, फूल बाजार बेकायदा परवाना वाटप आदी विविध ५१ मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT