Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : पुणे बाजार समितीला मिळाले सेसद्वारे ६८.४० कोटींचे उत्पन्न

Pune Market Committee : मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत उत्पन्नामध्ये १६ कोटींची वाढ

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला गेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) बाजार शुल्काद्वारे (सेस) ६८ कोटी ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत उत्पन्नामध्ये १६ कोटींची वाढ झाली आहे. अशी माहिती सभापती दिलीप काळभोर आणि सचिव आर. एस. धोंडकर यांनी दिली.

या बाबत धोंडकर म्हणाले, ‘‘बाजार समितीला २०२२-२३ या आर्थिक वर्षांत ५२ कोटी ५६ लाख ६ हजार ४४३ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. दरवर्षी मिळालेल्या उत्पन्नाच्या १० टक्के वाढीचे उद्दिष्ट ठेवले जाते, मात्र या वेळी ३० टक्के उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

बाजार शुल्क उत्पन्न वाढीसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तसेच नियमित बाजार शुल्क भरण्यासाठीही प्रशासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीला बाजार शुल्काच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीला मुख्य बाजारातील गूळ-भुसार, फळे व भाजीपाला, फूल, केळी, पान बाजार तसेच उत्तमनगर, खडकी, मोशी, पिंपरी, मांजरी आदी उपबाजारांसह जनावरांचा बाजार, भरारी फथक आणि बाह्य बाजार शुल्क आदींच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असल्याचे धोंडकर यांनी सांगितले.

फळे आणि भाजीपाला या वर्षांत विभागातून २७ कोटी ३४ लाख १७ हजार ५७३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, तर गूळ व भुसार विभागातून २७ कोटी ११ लाख ४१ हजार १२२ रुपये उत्पन्न मिळाले आहे.

बाजार समितीला प्रमुख उत्पन्न हे बाजारशुल्का (सेस)मधून मिळते. त्यामुळे हे उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. शेतीमालाची होणारी आवक आणि प्रत्यक्ष नोंद याची तपासणी केली जात आहे. गाळ्यांवरील आवकेच्या नोंदीही तपासल्या जात आहेत. त्यामुळे बाजार शुल्काच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली.
- दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

आंबा ‘सेस’ चोरीवर करावे लागणार प्रयत्न
बाजार समितीमध्ये सध्या आंबा हंगाम जोमात सुरू झाला आहे. बाजार समितीला दरवर्षी कोकण हापूससह विविध राज्यांतील आंब्याची आवक होत असते. या हंगामात सेस लपविण्याचे प्रकार घडत असतात. ही सेस चोरी रोखण्यासाठी आणि उत्पन्न अधिक वाढीसाठी प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT