Sugar Production Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production Maharashtra : ऊस गाळपात पुणे विभाग आघाडीवर तर कोल्हापूर साखर उत्पादनात अग्रेसर

Sugarcane Production : १९२ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे. यातील ९४ सहकारी आणि ९८ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Pune Kolhapur : राज्यात १ नोव्हेंबरपासून उसाचा गळीत हंगाम सुरू झाला. सुरूवातीच्या टप्प्यात हंगाम संथ गतीने सुरू झाला असला तरी महाराष्ट्र गाळपात आघाडीवर गेल्याचे दिसून येत आहे. राज्यातील १९२ साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगामात सहभाग घेतला असून त्यात ९४ सहकारी आणि ९८ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

साखर आयुक्तालयाने प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात २० डिसेंबर २०२३ अखेर ३३२.२७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. सध्या राज्यात गाळप पूर्ण क्षमतेने सुरु असून ८.६ च्या सरासरी उताऱ्याने २८५.८८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात सध्या गाळप परवाने असलेले १९२ साखर कारखाने सुरू आहेत. यामध्ये ९४ सहकारी आणि ९८ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

सध्या पुणे विभाग आघाडीवर गाळप करत आहे. २९ साखर कारखान्यांनी ७५.३९ लाख टन उसाचे गाळप करून ६६.५७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी उतारा ८.८३ इतका आहे. यानंतर सोलापूर विभागाने दुसऱ्या स्थानावर राहत ७२.६६ लाख टन ऊस गाळप केले आहे. ९३ सरासरी उताऱ्यासह सोलापूर विभागात ५७.६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

तर कोल्हापूर विभागात ३७ साखर कारखान्यांनी ६८.१९ लाख टन उसाचे गाळप केले आहे तर ६६.७३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याची रिकव्हरी ९.७९ सरासरी उताऱ्यासह राज्यात आघाडीवर आहे.

महाराष्ट्र गाळपात आघाडीवर

१५ डिसेंबरपर्यंत देशातील १२ राज्यांत ४९९ साखर कारखान्यामध्ये ८५७.०४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. मागच्या वर्षी १५ डिसेंबरपर्यंत ९२४.३३ लाख टन ऊस गाळप झाले होते. महाराष्ट्राने २९६ लाख टन गाळप करून गाळपातही देशात आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशात २४३ लाख टन, तर कर्नाटकात २११ लाख टनांचे उसाचे गाळप झाले आहे.

संपूर्ण देशात १५ डिसेंबरपर्यंत ७४.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी याच कालावधीत ते ८१.८० लक्ष टन झाले होते. चालू हंगामाअखेर देशभरात २९१.५० लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT