Shivendrasinhraje Bhosale agrowon
ॲग्रो विशेष

Shivendrasinhraje Bhosale : दर्जेदार बियाणे, खते द्या; बनावट बियाण्यांची विक्री रोखा

Bogus Seeds Latur : बनावट बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

sandeep Shirguppe

Latur Farmers : यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीबाबत योग्य मार्गदर्शन करून दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावीत. तसेच बनावट बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव उपस्थित होते.

शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांच्या उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कृषी विभागाने विशेष काळजी घ्यावी. पुरेशा प्रमाणात बियाणे आणि रासायनिक खते उपलब्ध होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना पेरणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जास्तीत जास्त शेती शाळांचे आयोजन करावे.

बँकांकडून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा होईल, याकडे लक्ष द्यावे. बनावट बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश पालकमंत्री भोसले यांनी दिले. शेतकऱ्यांकडील बियाणांची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करावे. प्रत्येक तालुकास्तरावर संबंधित आमदारांच्या उपस्थितीत खरीप पूर्वतयारी आढावा बैठक घ्यावी.

गावपातळीवर जनजागृती मोहीम राबवून लागवड पद्धती, बियाणे प्रक्रिया आणि उगवणक्षमता तपासणी याबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि पीएम किसान सन्मान योजना, ॲग्रिस्टॅक यांच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशनहस्ते करण्यात आले.

यंदाही सोयाबीनची सर्वाधिक पेरणी

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाची माहिती दिली. खरीप हंगामात चार लाख ८२ हजार ७०२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन आहे. यासाठी तीन लाख ६२ हजार २७ क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. गतवर्षी खरीप हंगामात एक लाख आठ हजार ६४६ मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर झाला होता, तर यंदा एक लाख १९ हजार ७६० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर आहे. बियाणे आणि खतांची पुरेशीउपलब्धता असल्याचे त्यांनी सांगितले.

उपस्थित लोकप्रतिनिधींनी खरीप पूर्वतयारीबाबत सूचना मांडल्या आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुक्यात विमा कंपनीचे कार्यालय सुरु करावे, असे सांगितले.

पाणी टंचाईचाही आढावा...

संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्री भोसले यांनी आढावा घेतला. पाणी टंचाई निर्माण होणाऱ्या भागात तातडीने उपाययोजना राबवून तेथील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत यामध्ये दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जल जीवन मिशन योजनेतील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून कामांना गती देण्याच्या अशा सूचना दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी पाणी टंचाई निवारणासाठी जिल्ह्यात हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT