Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : ऊस गाळपासाठी पोलीस संरक्षण द्या

Sugarcane Crushing : आंदोलकांनी बंद केलेल्या कारखान्याचे गाळप पोलीस संरक्षण देऊन सुरु करावे अशी मागणी लक्ष्मी नृसिंह शुगर कारखाना व्यवस्थापनाने शुक्रवारी (ता. ३)जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या केली आहे.

Team Agrowon

Parbhani News : आंदोलकांनी बंद केलेल्या कारखान्याचे गाळप पोलीस संरक्षण देऊन सुरु करावे अशी मागणी लक्ष्मी नृसिंह शुगर कारखाना व्यवस्थापनाने शुक्रवारी (ता. ३)जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या केली आहे.

या संदर्भात जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले की, कारखान्याचा गाळप हंगाम २०२३-२४ बुधवारी (ता. १) पासुन करणार होत आहे. परंतु कारखाना स्थळी अचानक परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास बाबर व हनुमान चांगभले यांच्यासह जमावाने येऊन कारखान्याच्या मागील दरवाजातून आत येऊन कारखान्याचे सरव्यवस्थापक यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे.

सर्व अधिकारी व कर्मचारी कामगार यांना प्रवेशद्वाराबाहेर काढून कामकाज बंद केलेले आहे. आंदोलकांनी कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना लेखी अथवा तोंडी न देता कारखान्यास बुधवारी (ता. १) बेकायदेशीरपणे एक निवेदन देवून ठिया आंदोलन कारखान्याच्या प्रवेशाद्वारा आत सुरु केले आहे.

त्यांनी निवेदनाद्वारे अवास्तव मागण्या केलेल्या आहेत. कारखान्याने गत हंगाम २०२२-२३ मध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणे एफआरपी दर २२९५.६३ रुपये इतका आलेला असुन कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दा प्रमाणे प्रथम उचल २२०० रुपये व दुसरा हप्ता १०० रुपये असे एकूण २३०० रुपये प्रमाणे संपूर्ण उसाची रक्कम अदा केलेली आहे. त्याचबरोबर कारखाना व्यवस्थापनाने २०२३ २४ करिता २५०० रुपये प्रमाणे पहिली उचल जाहीर केलेली आहे.

तोडणी वाहतूक यंत्रणा भरणा करून त्यांना अॅडव्हान्स स्वरूपात रक्कम ३० कोटी रुपये वाटप केलेले आहेत. सर्व कामगार हजर असताना त्यांना ठिय्या आंदोलनामुळे कारखान्यास वेळेत उस गाळप सुरुवात करता आलेली नाही.

त्यामुळे कारखाना परीसरातील उभा असलेल्या उसाचे गाळप होण्यास अडचणी होत आहे. तोडणी झालेला शेतकऱ्यांचा ऊस जागेवर वाळत आहे. ठिय्या आंदोलन तात्काळ थांबवण्यासाठी संबंधितास तात्काळ सूचना व्हाव्यात व कारखाना गाळप हंगाम सुरु करण्यासाठी सहकार्य करावे, असे निवेदनात नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT