Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : ...अन्यथा हातात दगड घेऊ

Crop Insurance : मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकरी संकटांना सामोरा जात आहे. अतिवृष्टी, अवेळी पाऊस, गारपीट यामुळे तो खचला आहे.

Team Agrowon

Buldana News : ‘‘सरकार आणि पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, अन्यथा आम्ही हातात दगड घेऊ आणि शेतकऱ्यांच्या हातात देखील दगड देऊ,’’ असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी (ता. ३०) दिला.

‘‘पावसाने नुकसान झालेल्या पिकांची वर्गवारी करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी,’’ अशी मागणीही त्यांनी केली. तालुक्यातील माळ सावरगाव येथे पाऊस व गारपिटीने द्राक्षबाग व कपाशीच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.

वडेट्टीवार म्हणाले, ‘‘मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकरी संकटांना सामोरा जात आहे. अतिवृष्टी, अवेळी पाऊस, गारपीट यामुळे तो खचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्याची मागणी हिवाळी अधिवेशनात करणार आहे.

व्यावसायिक क्षेत्राचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते. मग शेतकऱ्यांनी तुमचे काय घोडे मारले?.’’ ‘‘पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना चांगली वागणूक देत नाहीत.

त्यांच्याकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी. पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांची कायम थट्टा करतात. मागील वर्षाचे पैसे अजून मिळाले नाहीत. या कंपन्या निकष, अटी सांगून जबाबदारी झटकत आहेत.’’ असे वडेट्टीवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT