Agriculture Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : साडेसात अश्‍वशक्तीवरील पंपांनाही मोफत वीजपुरवठा करा

Free Electricity : राज्य शासनाने ७.५ अश्‍वशक्तीवरील शेती पंपधारकांना वीजपुरवठा सवलत द्यावी, अशा मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले.

Team Agrowon

Kolhapur News : ‘राज्य शासनाने ७.५ अश्‍वशक्तीवरील शेती पंपधारकांना वीजपुरवठा सवलत द्यावी, अशा मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. या मागणीबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करावे लागेल.

त्यासाठी शुक्रवारी (ता. ६) खासगी शेती पंपधारकांची बैठक घेण्यात येणार आहे’, अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘सरकारने ‘बळीराजा वीज योजना’ लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील ७.५ अश्‍वशक्तीपर्यंतच्या शेती पंपधारकांना एप्रिल २०१४ पासून मोफत वीज देण्यास मान्यता देण्यात आली.

हा निर्णय शेतकऱ्यांसाठी बुद्धिभेद करणारा आहे. राज्यातील ओलिताखालील क्षेत्रापैकी ३२ लाख हेक्टर जमीन उपसा सिंचनामुळेच ओलिताखाली येते. कोल्हापूर जिल्ह्यात दोन लाख २५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. जिल्ह्यात शेती पंपधारकांची संख्या एक लाख ६४ हजार आहे.

यात ७.५ अश्‍वशक्तीवरील शेती पंपधारकांची संख्या ४९ हजार ७०६ आहे. तर ७.५ अश्‍वशक्तीच्या आतील पंपधारकांची संख्या एक लाख १४ हजार आहे. या शेती पंपधारकांनी स्वतः भांडवली खर्च करून त्यासाठी कर्ज काढून पाइपलाइनद्वारे आपले क्षेत्र ओलिताखाली आणले आहे.

हा वर्ग या योजनेपासून वंचित राहणार आहे. ज्या शेती पंपधारकांना योजनांचा लाभ मिळत नाही, त्यांना विजेचा प्रतियुनिट दर जास्त आकारला जात आहे. हा खासगी शेती वीज पंपधारकावर अन्याय आहे.’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT