Irrigation Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Scheme : साक्रीतील उपसासिंचन योजनांसाठी तरतूद करा : गावित

Minister Dr. Vijayakumar Gavit : साक्री तालुक्यातील १० उपसासिंचन योजनांसाठी ६५ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून द्यावी.

Team Agrowon

Irrigation Dhule News : साक्री तालुक्यातील १० उपसासिंचन योजनांसाठी ६५ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार मंजुळा गावित यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे केली आहे.

साक्री तालुक्यातील पांझरा, जामखेली, मालनगाव, बुराई असे मोठे मध्यम प्रकल्प गेल्या ३० ते ४० वर्षांपूर्वी बांधलेले आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता मोठी आहे. शासनाच्या धोरणानुसार २० टक्के क्षेत्रात धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या वरच्या बाजूस १० उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

या उपसा सिंचन योजनांना महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने २० जानेवारी २०२१ च्या निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.

त्यात प्रामुख्याने लाटीपाडा प्रकल्पावर सीतारामपूर, सुकापूर, कोकणगाव या ३ उपसासिंचन योजना, मालनगाव प्रकल्पावर शिरसोले, खट्याळ, आंबा आणि खांडबारा या ३ उपसासिंचन योजना, जामखेली प्रकल्पावर पुण्याचापाडा, चिंचपाडा, धनगाई, दापूर अशा ४ उपसासिंचन योजना राबविल्या जातील.

दहा उपसासिंचन योजना आदिवासी क्षेत्रात येत आहेत. या योजना कार्यान्वित झाल्यास मतदार संघातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत उपसासिंचन योजनेद्वारे पाणी उपलब्ध होऊन सिंचनास मिळेल. या योजना कार्यान्वित करण्यासाठी ६४ कोटी ४२ लाख ६५ हजार ६४४ म्हणजेच ६५ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे.

साक्री विधानसभा मतदार संघातील सीतारामपूर, सुकापूर, कोकणगाव, शिरसोले, खट्याळ आंबा, खांडबारा, पुण्याचापाडा, चिंचपाडा, धनगाई, दापूर अशा १० उपसासिंचन योजनांसाठी ६५ कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशा मागणीचे पत्र डॉ. गावित यांना दिले. त्यासाठी निधी देण्यात येईल, असे आश्‍वासन मंत्री गावित यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तुरीचा भाव टिकून; सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिरावला, डाळिंबाचे भाव टिकून तर आल्याला उठाव

Parliament Budget Session 2026: लोकसभेतील काँग्रेसचे आठ खासदार निलंबित; राहुल गांधीना बोलू न देण्यावरून गदारोळ

Rice Export: भारत-अमेरिका व्यापार करारामुळे तांदूळ निर्यातीला चालना मिळेल, निर्यातदारांना दिलासा

Water Hyacinth Spread: इचलकरंजीत पंचगंगा नदीत जलपर्णीचे सावट

Mahavistar AI App: सांगलीत महाविस्तार ॲपवर ६१ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी

SCROLL FOR NEXT