Swabhimani Shetkari Sanghtana Agrowon
ॲग्रो विशेष

Swabhimani Shetkari Sanghtana : अतिवृष्टी अनुदान, पीकविमा द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार

Boycott of Assembly Elections : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपू्र्वी अतिवृष्टीचे अनुदान तसेच २५ टक्के अग्रिम पीकविमा रक्कम अदा करावी. अन्यथा गावोगावी शेतकरी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपू्र्वी अतिवृष्टीचे अनुदान तसेच २५ टक्के अग्रिम पीकविमा रक्कम अदा करावी. अन्यथा गावोगावी शेतकरी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, उत्पादन निम्म्याने घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाही. सोयाबीन, कापसाची हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी राजरोसपणे सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाने अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण संभाव्य विमा रकमेपैकी २५ टक्के अग्रिम रक्कम जमा करण्याचे आदेश दिले. परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झालेली नाही. त्याचप्रमाणे अतिवृष्टीचे अनुदानदेखील खात्यात जमा झालेले नाही.

त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ अतिवृष्टीचे अनुदान तसेच पीकविम्याची अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात यावी, अन्यथा गावोगावी शेतकरी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, गजानन तुरे, मुंजा लोडे, माउली शिंदे, विठ्ठल चोखट, नामदेव काळे, सुदाम ढगे, राम गोळेगावकर यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT