Balasaheb Thorat Agrowon
ॲग्रो विशेष

MLA Balasaheb Thorat : मागणीनंतर तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या : थोरात

Water Supply Tanker : या वर्षी अल-लिनोच्या प्रभावामुळे उशिरा येणारा पाऊस आणि कमी पाऊस या बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहिले पाहिजे

Team Agrowon

Nagar Water Shortage News : चालू वर्षी अल-निनोच्या प्रभावामुळे कमी व उशिरा पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने मागेल त्यांना रोजगार हमीचे काम व मागणीनंतर तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या असे माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

संगमनेर येथे उपविभागीय कार्यालय येथे टंचाई आढावा बैठक झाली. अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार सत्यजित तांबे, उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, माजी सभापती सुनंदा जोर्वेकर, नवनाथ अरगडे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद कुलाळ, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘या वर्षी अल-लिनोच्या प्रभावामुळे उशिरा येणारा पाऊस आणि कमी पाऊस या बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहिले पाहिजे. ज्या गावात रोजगार हमी कामाची मागणी किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी असेल तर तत्काळ उपलब्ध करून द्या.

तालुका हा विस्ताराने मोठा असून, सर्व ग्रामसेवक व तलाठी यांनी गावच्या समस्यांवर लक्ष ठेवले पाहिजे. हा अडचणीचा काळ असून, ३० जुलैपर्यंतचे पिण्याच्या पाण्याचे, रोजगार हमीच्या कामाचे व चाऱ्याचे नियोजन करा.

जलजीवन व जीवन प्राधिकरणच्या योजनांची कामे ज्या ठिकाणी सुरू आहेत. ती बंद होता कामा नये. नळ योजना दुरुस्त करून घ्या. पिण्याचे पाणी रोजगार हमीची कामे आणि चारा याबाबत प्रशासनाने अधिक सतर्क राहावे, अधिकाऱ्यांनी मंजूर झालेली सर्व कामे अधिक चांगले होण्यासाठी काम करा. कुणाच्याही राजकीय दबावाला बळी पडू नका.’

राजकारणासाठी जनतेशी खेळू नये’

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘हंगेवाडी व उंबरी बाळापूर येथे जलजीवनअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरू आहे. मात्र फक्त राजकारणासाठी या योजना बंद पाडण्याचे काम काही लोक करत असून अधिकाऱ्यांनी त्यांच्या दबावाला बळी पडू नये.

संगमनेरमधील विकास कामे बंद पडण्याचे काही लोक उद्योग करत असून, सत्ता येते आणि जाते त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करा.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

Tur Pest : तुरीवर अळीचे आक्रमण; वातावरण बदलाचा फटका

Elephant Rampage : जंगली हत्तींचा शेतशिवारात धुमाकूळ

Sugarcane Harvester : चांगतपुरी गावची पंजाब आणि हरियानाशी स्पर्धा

SCROLL FOR NEXT