Farmers Demand Agrowon
ॲग्रो विशेष

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Farmers Demand : महावितरणने शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

गणेश कोरे

Shirur News : मांडवगण फराटा येथे एका महिन्यात वंश सिंग व शिवतेज टेंभेकर या चिमुकल्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या दोन्ही घटना घडल्या त्यावेळी दोन्ही ठिकाणी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता.

या घटनांमुळे परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. महावितरणने शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे येथील शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरणचे मांडवगण फराटा शाखा अभियंता इर्शाद शेख यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदन दिले.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मांडवगण फराटा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत. मांडवगण फराटा परिसरात गेल्या एक महिन्याच्या आत दोन चिमुकल्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना होत असताना परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यास जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतीपंपासाठी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, घरगुती वीज ही २४ तास उपलब्ध करून द्यावी. आरडीएस योजनेतून येथे सिंगल फेज डीपी मंजूर करून द्यावे.

या वेळी सागर फराटे, मांडवगण सोसायटीचे माजी उपाध्यक्ष अमोल जगताप, संपत फराटे, पांडुरंग फराटे, गोरक्ष शितोळे, अंकुश जगताप, किरण फराटे, राजू कांबळे, महेश फराटे, चंद्रकांत लगड, मनोज फराटे, पोपट जगताप, संदीप शितोळे, अजित पवार, दिगंबर बोत्रे, ज्ञानदेव फरगडे, नवनाथ जाधव, अनिल शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT