Nagpur Winter Session Agrowon
ॲग्रो विशेष

Assembly Winter Session 2023 : सरसकट नुकसान भरपाई द्या! गळ्यात संत्र्याच्या माळा घालून महाविकास आघाडीचे विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन

Winter Session Maharashtra : नागपूरमध्ये आजपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यामुळे पुढचे 10 दिवस उपराजधानी राजकीय घडामोडींचं केंद्र असेल. शेती नुकसान, मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जुंपण्याची शक्यता आहे.

Swapnil Shinde

Nagpur Hiwali Adhiveshan : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात आजपासून सुरुवात होत आहे. गारपीट व अवकाळीमुळे झालेली नुकसान, मराठा आरक्षण, ड्रग्ज कारवाई, आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे नागपुरातील वातावरण तापले आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संत्र्याच्या माळा घालून महाविकास आघाडीचे आमदार शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सरकार प्रचारात व्यस्त, अवकाळी पावसामुळे शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे… संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे… शेतकऱ्यांची चेष्टा करणार्‍या सरकारचा निषेध असो… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!

Human Culture: पेरणीतून उभी राहिली मानवी संस्कृती : प्रा. इंद्रजित भालेराव

Women Empowerment: रेशीम साडी विणकामातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार

Onion Farmer Loss: कांदा उत्पादक उद्ध्वस्त! गेल्या चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे ४०० कोटींचे नुकसान

Pre Monsoon Rain: सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT