Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : दूधदरासाठी नगरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Milk Protest Update : दुधाला ४५ रुपये हमीदर मिळावा, पशुखाद्याचे दर कमी करावेत व सरकारचे त्यावर नियंत्रण असावे, दूध मूल्य आयोग स्थापन करावा यासह विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर मंगळवारी (ता. १४) आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

Team Agrowon

Nagar News : दुधाला ४५ रुपये हमीदर मिळावा, पशुखाद्याचे दर कमी करावेत व सरकारचे त्यावर नियंत्रण असावे, दूध मूल्य आयोग स्थापन करावा यासह विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुग्धविकासमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर मंगळवारी (ता. १४) खर्डा-भाकरी खाऊन अंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करण्याचे अश्वासन दिल्याने कार्यकर्त्यांनी नगरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंदोलन केले. त्यानंतर विखे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबईत सोमवारी २० नोव्हेंबर रोजी दूध संघचालकांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

राज्यात गायीच्या दुधाच्या दरात कमालीची घसरण होत असून चार ते पाच महिन्यात प्रतिलिटर दहा रुपये दर खाली आनले आहेत. दुग्धविकासमंत्री, दुग्धविकास विभाग पडत्या दूध दराकडे फारसे लक्ष देत नाहीत. शासनाने दूध दरासाठी नियुक्त केलेली समितीही काम करत नाही. एक तर दुष्काळासारख्या गंभीर परिस्थितीमुळे दूध उत्पादक शेतकरी त्रस्त झालेले असताना दूध दर पाडले जात असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बारामती तालुक्‍यात सागर जाधव आकरा दिवसापासून याच प्रश्‍नावर उपोषण करत आहेत.

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दूधदराच्या प्रश्नावर लोणी (ता. राहाता) येथे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर मंगळवारी खर्डा-भाकर खाऊन अंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र वरिष्ठ पातळीवरून मेसेज फिरल्यानंतर व जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आल्यावर विखे यांच्या घराएवजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंदोलन झाले.

त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात रयत क्रांती संघटनेचे भाऊसाहेब मांडे, नंदु रोकडे, संतोष धसाळ, नयन कोठुळे, पवार दीपक भोसले, जगन पवार, भिकाजी रेवाळे, अकाश निशाने, रवी क्षीरसागर, सूर्यकांत शिंदे, यांच्यासह पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. पंजाब, हरियाना, कर्नाटक राज्यात चाळीस रुपयांपेक्षा अधिक दर देण्याला परवडतो. महाराष्ट्रात दर कसा दर द्यायला परवडत नाही असा प्रश्न या वेळी उपस्थित केला. दूध प्रश्नावर राज्यातील दूध संघांच्या प्रमुखाची मुंबईत बैठक घेणार असल्याचे सांगितले.

सोमवारी राज्यात ‘रास्ता रोको’चे नियोजन

नगर जिल्ह्यासह राज्यातील कोणत्याही पक्ष, संघटनेला सोबत न घेता केवळ दूध उत्पादकांनी दूधदरासाठी १९ नोव्हेंबरला राज्यातील विविध भागात रास्ता रोको अंदोलन करण्याचे नियोजन केले आहे. दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २० नोंव्हेंबर रोजी खासगी दूधसंघ चालकांची बैठक घेण्याचे व दूधदर कमी देणाऱ्या संघांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.

मात्र आतापर्यंत दुग्धविकास मंत्र्यांकडून केवळ पोकळ अश्वासन मिळाली आहेत. त्यामुळे ठोस निर्णय होईपर्यत अंदोलन सुरूच राहणार असून १९ नोव्हेंबर रोजी राज्यात जागोजागी दूध उत्पादक शेतकरी अंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT