Sugarcane FRP Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : ऊसदरासाठी श्रीरामपूर येथे आंदोलन

Protest For Sugarcane FRP Issue : यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन महिना होत आला असला, तरी अजूनही जिल्ह्यातील उसाचा दर जाहीर केलेला नाही. मागच्या वर्षी ऊस नेण्यासाठी शेतकऱ्यांची लूट झाली.

Team Agrowon

Nagar News : यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन महिना होत आला असला, तरी अजूनही जिल्ह्यातील उसाचा दर जाहीर केलेला नाही. मागच्या वर्षी ऊस नेण्यासाठी शेतकऱ्यांची लूट झाली. आता मात्र ऊस कमी असल्याने शेतकऱ्यांना कारखानदार गोड बोलून ऊस नेत आहेत.

मात्र उसाचा दर जाहीर करण्याला नेहमीप्रमाणे टाळाटाळ करत आहेत. ऊसदर जाहीर करावा, अन्यथा ऊसगाळप बंद पाडू, असा इशारा देत बुधवारी (ता. २९) श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथे शेतकरी संघटनेने आंदोलन केले.

साखर कारखान्यांकडून मिळणाऱ्या मनमानी दराबाबत २०१३ च्या ऊसदर नियंत्रण आदेशान्वये राज्यात ऊस दर समिती अस्तित्वात असणे गरजेचे आहे. परंतु अशी समिती गेल्या दोन वर्षांपासून शिंदे सरकारने अस्तित्वात आणली नाही.

२००९-१० ला साखर २२०० रुपये क्विंटल होती. त्या वेळी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे एफआरपी १४०० रुपये असताना दोन हजार रुपये प्रतिटन दर दिला.

सी. रंगराजन समितीच्या शिफारशीप्रमाणे ७०ः३०, अथवा ७५ः२५ सूत्रानुसार शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये देणे कायदेशीर आहे. परंतु साखर आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्ह्यातील सर्व उपपदार्थ निर्मिती करणाऱ्या कारखान्यांचे महसुली उत्पन्न ४५० ते ७५० रुपये प्रतिटन कमी आले आहे.

म्हणजेच उपपदार्थ निर्मितीच्या प्रकल्पातून तोटाच दाखविला जातो. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व साखर कारखान्यांना पहिले समान पेमेंट ३५०० रुपये देण्याची सूचना करावी; अन्यथा शेतकरी व जिल्हा शेतकरी संघटना उसाच्या तोडी बंद करतील, असा इशारा संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Digital Agriculture Policy: डिजिटल सुसूत्रीकरणाचे स्वागतच!

Drought Relief: आंबेगावातील बाधित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार : दिलीप वळसे पाटील

Chana Variety: परभणी चना-१७ वाणाची पूर्व मध्य विभागासाठी शिफारस

Onion Market Update: खरीप लाल कांद्याच्या आवकेत ७५ टक्के घट

Agricoss Day: डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ डिसेंबरला राज्य अॅग्रीकॉस दिन

SCROLL FOR NEXT