Milk Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Issue : इंदापुरात ४० रुपये दरासाठी दूध ओतून आंदोलन

Protest For Milk Rate in Indapur : पशुखाद्याचे वाढलेले दर आणि दुधाचे कमी झालेले दर यामुळे पशुपालक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

Team Agrowon

Pune News : पशुखाद्याचे वाढलेले दर आणि दुधाचे कमी झालेले दर यामुळे पशुपालक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दर रुपये दर मिळावा, या मागणीसाठी इंदापूर येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी काही काळासाठी रास्ता रोको करीत दूध रस्त्यावर ओतून जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

शहरातील मुख्य वर्दळीचा असलेल्या बाबा चौक येथे सकाळी ११ वाजता दूध उत्पादकांच्या वतीने कोसळलेल्या दूध दराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

या वेळी आंदोलकांनी ‘कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही,’ ‘दुधाला चाळीस रुपये प्रतिलिटरला दर मिळालाच पाहिजे,’ ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

तसेच काही वेळासाठी बाबा चौकात जुना पुणे-सोलापूर मार्ग रोखून धरण्यात आला. यासह रस्त्यावर दूध ओतून देत सरकारच्या दुधाविषयीच्या धोरणांचा निषेध व्यक्त करीत दूध दरवाढ करण्याची मागणी केली.

दरम्यान, आंदोलन स्थळी इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार आणि मंडल अधिकारी एस. बी. हगारे यांनी निवेदन स्वीकारले त्यांनतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT