Milk Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : रयत क्रांती संघटनेतर्फे दूधदर वाढीसाठी रास्ता रोको

Rayat Kranti Sanghatana Protest : गायीच्या दुधाला ४० रुपये व म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ६० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. ११) पिरोळा फाटा (ता. सिल्लोड) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : गायीच्या दुधाला ४० रुपये व म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ६० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. ११) पिरोळा फाटा (ता. सिल्लोड) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या वेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाच्या कॅन भरून रस्त्यावर दूध ओतून सरकारकडे दूर दरवाढीची मागणी केली. मागील काही दिवसांपासून राज्यभरात दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.

अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. तरी सरकार शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने सरकारचे दूध दरवाढीच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर शेजुळ यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पिरोळा फाटा (ता. सिल्लोड) येथे आंदोलन करण्यात आले.

या वेळी दुग्धव्यवसाय शेतकरी कृष्णा शेजुळ, कल्पेश शेजुळ, अजय पारवे, काशिनाथ शेजुळ, विनोद शेजुळ, समाधान फुले, ज्ञानदेव मोठे, देवीदास जाधव, हरी शेजुळ उपस्थित होते. मंडल अधिकारी शंकर जैस्वाल, तलाठी श्रीमती गरुड यांना निवेदन देण्यात आले.

तर सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन क्षीरसागर यांनी फौज फाट्यासह बंदोबस्त ठेवला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT