Dr. Sharad Gadakh Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV Shiwarferi : फळे, भाजीपाला, फूलवर्गीय पिकांतूनच समृद्धी : प्रभातकुमार

Silver Jubilee Year of College of Horticulture : कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रक्षेत्रावर आयोजित शिवार फेरी तथा चर्चासत्र आणि प्रशिक्षण वर्गाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.शरद गडाख होते.

Team Agrowon

Akola News : केवळ अन्नधान्य उत्पादनावर अवलंबून न राहता फळे, भाजीपाला आणि फूल पिकांच्या लागवड तंत्रज्ञानासह प्रक्रिया आणि विपणनातूनच खरी समृद्धी लाभू शकते, असे प्रतिपादन भारत सरकारचे फलोद्यान आयुक्त प्रभात कुमार यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रक्षेत्रावर आयोजित शिवार फेरी तथा चर्चासत्र आणि प्रशिक्षण वर्गाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.शरद गडाख होते.

भारत सरकारच्या कृषी तथा उद्यानिकी विभागाच्या माध्यमातून विविध योजना विषयी माहिती देताना प्रभात कुमार यांनी गाव पातळीवर स्थापन करता येण्याजोगे प्रक्रिया उद्योग, बांबूसह इतर फळे, भाजीपाला व फुले पिकांच्या लागवडीसाठी तरुण पिढीने पुढे येण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ.गडाख यांनी दिवसागणिक वाढत जाणारी लोकसंख्या आणि घटत जाणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता शेतकरी कुटुंबातील युवकांनी भविष्याचा अंदाज घेऊन कौशल्याधारित स्वयंरोजगाराच्या वाटा शोधण्याचेही आवाहन केले. कुठल्याही क्षेत्रातील पदवीधराला कृषी आधारित प्रक्रिया तथा तत्सम संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.

शाश्वत शेतीसाठी विदर्भातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या या शिवारफेरीचे बुधवारी (ता.२१) उद्‌घाटन झाले. गुरुवारी (ता.२२) ही शिवारफेरी झाली. शिवारफेरीच्या उद्‌घाटनप्रसंगी विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील,

विभागीय कृषी सहसंचालक मिलिंद शेंडे, ज्येष्ठ उद्यान विद्यातज्ञ डॉ. लक्ष्मीकांत कुलवाल, महादेवराव भुईभार, डॉ. मंगेश देशमुख, डॉ. शशांक भराड, डॉ. अरविंद सोनकांबळे, प्रा. नितीन गुप्ता यांच्यासह कार्यकारी परिषद सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. डॉ. अरविंद सोनकांबळे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT