Lower Terana Upsa Irrigation Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Lift Irrigation Amendment : निम्न तेरणा ‘लिफ्ट एरिगेशन’ दुरुस्तीचा प्रस्ताव

Irrigation Scheme : बारा वर्षांपासून बंद असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.

Team Agrowon

Dharashiv News : बारा वर्षांपासून बंद असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी ११३.५३३ कोटी अंदाजपत्रकीय किंमतीचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून तीन जून रोजी प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

आमदार पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जिल्ह्यासाठी महत्त्वाची योजना कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. या अनुषंगाने विविध विभागांची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी आता शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

धाराशिव, लोहारा व औसा तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांसाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे. अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्तीअभावी बंद असलेली ही योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी या तिन्ही विभागांशी संबंधित दुरुस्ती आवश्यक होती. या योजनेचे आशिव, कानेगाव, करजखेडा, वडाळा, बामणी असे पाच टप्पे असून योजनेमुळे सहा हजार ८९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

यातील पाच हजार सातशे हेक्टर क्षेत्र एकट्या धाराशिव तालुक्यातील आहे. योजना सुरू करण्यासाठी योजेनची संपूर्ण पाहणी करून स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी संबंधित दुरुस्तीचे अंदाज पत्रक तयार करून विशेष दुरस्तीचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या मंजुरीने राज्य तांत्रिक सल्लागार समितीच्या मंजूरी साठी पाठविण्यात आला होता.

पाठपुरावा सुरू असल्याची माहिती

उच्चाधिकार समितीने ११ जानेवारी २०२४ रोजीच्या बैठकीमध्ये प्रस्तावास मंजुरी दिली होती. त्यानंतर त्रुटी पूर्तता करून अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. शासनाची मंजूरी व निधीची तरतूद करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT